उपसभापती शिंदे यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:33 IST2021-07-28T04:33:50+5:302021-07-28T04:33:50+5:30

तुळजापूर : येथील पंचायत समितीचे नूतन उपसभापती दत्तात्रय शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कार्यालयाच्या वतीने गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, पाणीपुरवठा ...

Deputy Speaker Shinde felicitated | उपसभापती शिंदे यांचा सत्कार

उपसभापती शिंदे यांचा सत्कार

तुळजापूर : येथील पंचायत समितीचे नूतन उपसभापती दत्तात्रय शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कार्यालयाच्या वतीने गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, पाणीपुरवठा अधिकारी मोहन सरवदे यांनी पुष्पहार, गुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही त्यांचे स्वागत केले. यावेळी सभापती रेणुकाताई इंगोले, पंचायत समिती सदस्य सिद्धेश्वर कोरे, कलसुरे, भिवा इंगोले आदी अधिकारी, कर्मचारी कर्मचारी उपस्थित होते.

आ. पाटील यांचा शिवसेनेकडून सत्कार

(फोटो : गोविंद खुरुद २७)

तुळजापूर : वसंतराव नाईक तांडा / वस्ती सुधार योजना तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अंतर्गत तुळजापूर तालुकाध्यक्षपदी शिवसेना जिल्हाप्रमुख आ. कैलास पाटील यांची निवड झाली. याबद्दल शिवसेना शहर व तुळजापूर तालुका शाखेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी उपजिल्हा प्रमुख श्याम पवार, शहर प्रमुख सुधीर कदम, तालुका उपप्रमुख सुनील जाधव, माजी तालुकाप्रमुख बाळकृष्ण पाटील, संजय भोसले, बाजार समिती उपसभापती बापूसाहेब नाईकवडी, उपशहर प्रमुख बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.

260721\00541829-img-20210726-wa0033.jpg

तुळजापुर फोटो

Web Title: Deputy Speaker Shinde felicitated