शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

‘डेडलाईन’ संपूनही अतिक्रमणे ‘जैसे थे’

By admin | Updated: July 3, 2014 00:19 IST

वाशी : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या वाशी फाटा ते कळंब रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे वाढली असून, प्रशासनाकडून दिलेल्या नोटिसीत आठ जूनची मुदत देण्यात आली होती.

वाशी : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या वाशी फाटा ते कळंब रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे वाढली असून, प्रशासनाकडून दिलेल्या नोटिसीत आठ जूनची मुदत देण्यात आली होती. वास्तविक ही मुदत संपून आता महिन्याचा कालावधी लोटत असला तरी अद्याप ना अतिक्रमणधारकांनी स्वत:हून अतिक्रमणे काढली ना प्रशासनाने ती हटविली. त्यामुळे हा प्रश्न अद्याप ‘जैसे थे’ आहे.जिल्ह्यात अनेक ठिकाणी छोट्यामोठ्या व्यावसायिकांसह धनदांडग्यांनीही सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमणे करून वाहतुकीस अडथळे निर्माण केले होते. मध्यंतरी उस्मानाबाद, भूम, परंडा, कळंब, शिराढोण आदी ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ही अतिक्रमणे हटविण्यात आली. वाशी येथील ३९ अतिक्रमणधारकांनाही सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटिसा बजावून आठ जूनपर्यंत अतिक्रमणे काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, अद्यापही याबाबत कार्यवाही झालेली नाही.सध्या शहरातील ग्रामीण रूग्णालय, जुन्या बसथांब्यावर, पारा चौकासह आदी ठिकाणी अतिक्रमणे आहेत. यामुळे वाहतुकीस कोंडी निर्माण होत असून विद्यार्थी, महिलांसह वाहनचालकांनाही या रस्त्यावरून जातना कसरत करावी लागत आहे. त्यातच अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला दुचाकी लावल्या जात असल्याने रस्ते अरूंद झाले आहेत. या अतिक्रमणांबाबत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केवळ कागदी घोडे नाचवून आपली जबाबदारी तहसीलसदारांच्या खांद्यावर टाकली आहे. ग्रामपंचायतीचेही याकडे दुर्लक्षच असल्याचे दिसते.याबाबत तहसीलदार रामेश्वर गोरे यांना विचारणा केली असता येत्या आठवडाभरात अतिक्रमणे हटविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. तसेच जे स्वत:हून अतिक्रमण हटवणार नाहीत त्यांच्यावर पोलिस कारवाही करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. (वार्ताहर)