शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषदेची उद्या मतमोजणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2018 19:12 IST

न्यायालयीन प्रक्रियेत अडकून पडलेल्या उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषदेच्या मतमोजणीचा मार्ग खंडपीठाच्या आदेशाने मोकळा झाला आहे़ याअनुषंगाने आता १२ जून रोजी सकाळी ८ वाजता उस्मानाबाद येथे मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे.

उस्मानाबाद : न्यायालयीन प्रक्रियेत अडकून पडलेल्या उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषदेच्या मतमोजणीचा मार्ग खंडपीठाच्या आदेशाने मोकळा झाला आहे़ याअनुषंगाने आता १२ जून रोजी सकाळी ८ वाजता उस्मानाबाद येथे मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे.

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद मतदारसंघात भाजपचे सुरेश धस व आघाडी पुरस्कृत उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात अतिशय अटीतटीची लढत होत आहे. ऐन मतदानाच्या तोंडावर बीड जिल्ह्यातील १० नगरसेवकांना नगरविकास विभागाने अपात्र ठरविले होते. यानंतर याच विषयाशी संबंधित तब्बल ५ याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल झाल्या होत्या. त्यापैकी एक फेटाळून लावत उर्वरीत चार याचिकांचा एकत्रच निकाल खंडपीठाने सोमवारी दिल्यानंतर मतमोजणीचा मार्ग खुला झाला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राधाकृष्ण गमे यांनी निवडणूक आयोगाला मतमोजणीच्या कार्यक्रमासंदर्भात सूचना कळविण्याची विनंती केली होती. सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आयोगाचे निर्देश त्यांना प्राप्त झाले असून, त्यानुसार मंगळवारी मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. उस्मानाबादच्या तहसील कार्यालयात सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरु होणार असून, ११ वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राधाकृष्ण गमे म्हणाले, सायंकाळीच आयोागचे निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार १२ जून रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणीस सुरुवात होईल. प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून, आता मतमोजणीशी संबंधित यंत्रणांना याबाबत कळविण्याचे काम सुरु आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक