घरोघरी जाऊन घरकुल प्रस्तावांचे संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:28 IST2021-02-08T04:28:46+5:302021-02-08T04:28:46+5:30

पारगाव : वेळेत कागदपत्र दाखल न झाल्याने अनेक लाभार्थी घरकुलांपासून वंचित राहत आहेत. त्यामुळेच आता लाभार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचे ...

Collection of door-to-door proposals | घरोघरी जाऊन घरकुल प्रस्तावांचे संकलन

घरोघरी जाऊन घरकुल प्रस्तावांचे संकलन

पारगाव : वेळेत कागदपत्र दाखल न झाल्याने अनेक लाभार्थी घरकुलांपासून वंचित राहत आहेत. त्यामुळेच आता लाभार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचे घरकुलांचे प्रस्ताव संकलित करण्याचा उपक्रम वाशी पंचायत समितीने राबविला. यानुसार रूई लोणखस ग्रामपंचायतअंतर्गत प्रस्तावांचे संकलन करण्यात आले.

वाशी पंचायत समितीअंतर्गत २०१९-२० या वर्षात ६७७ घरकुलांचे उद्दिष्ट असून, यापैकी केवळ ३०४ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. उर्वरित अप्राप्त प्रस्ताव संकलित करण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून शनिवार व रविवारी क्षेत्रीय अधिकारी व ग्रामसेवक यांच्या उपस्थितीमध्ये घरोघरी जाऊन प्रस्ताव संकलन करण्याची ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. गटविकास अधिकारी विलास खिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली रूई लोणखस ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका सुरेखा कदम तर घाटपिंप्री येथे ग्रामसेवक तुपरे आणि क्षेत्रीय अधिकारी एस. एस. शिनगारे यांनी प्रस्ताव संकलित केले.

कोट......

वाशी तालुक्यातील रमाई आवास योजनेत सन २०१९-२० च्या उद्दिष्टपूर्तीसाठी ३१ गावांतील ६७७ प्रस्तावांपैकी ३७३ प्रस्ताव अप्राप्त आहेत. त्या सर्वांना घरकुल वेळेत मिळावे व लाभार्थ्यांची पात्र अपात्र यादीची शहानिशा करण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांची कागदपत्रे जागेवरच जमा करून घरकुल मंजुरी दिली जाणार आहे. त्यासाठी शनिवार रविवार या दोन दिवशी प्रस्ताव संकलन विशेष मोहीम राबविली.

- विलास खिल्लारे, गटविकास अधिकारी.

Web Title: Collection of door-to-door proposals