चिमुकल्यांचा सुट्टीचा मूड कायम; अभ्यासाचाच पडला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:21 IST2021-07-12T04:21:06+5:302021-07-12T04:21:06+5:30

सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत आहे. १० वर्षांपेक्षा कमी वयाेगटातील मुलामुलींना काेराेनाचा संसर्ग हाेण्याची शक्यता ...

Chimukalya's holiday mood remains; Forget the study | चिमुकल्यांचा सुट्टीचा मूड कायम; अभ्यासाचाच पडला विसर

चिमुकल्यांचा सुट्टीचा मूड कायम; अभ्यासाचाच पडला विसर

सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत आहे. १० वर्षांपेक्षा कमी वयाेगटातील मुलामुलींना काेराेनाचा संसर्ग हाेण्याची शक्यता अधिक आहे; तर १८ वर्षे वयापर्यंतच्या मुलांना सध्या कमी धाेका असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे चिमुकली मुले, मुली अजूनही अभ्यासाला लागली नाहीत. यामुळे पालक व शिक्षक हैराण झाले आहेत. ऑनलाइन शिक्षणामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची हेळसांड झालेली आहे. त्यातल्या त्यात लहान मुलांच्या अभ्यासाचे माेठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. लहान वयात एकमेकांच्या सहवासातून, शिक्षकांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनातून विद्यार्थी-संकल्पना, अक्षरओळख शिकतात. त्यांच्यापासून ते वंचित राहत असल्याचे दिसून येत आहे. ऑनलाइन वर्गात विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्र करणे, समरस करणे, शिक्षकांसाठी माेठे आव्हान ठरत असल्याचे दिसून येत आहे.

प्रत्यक्ष वर्गात शिक्षण घेत असताना इतर मुलांसाेबत कविता म्हणणे, अक्षर, प्राणी यांची ताेंडओळख हाेणे या गाेष्टी विद्यार्थ्यांसाठी सहज, साेप्या हाेत असतात; मात्र ऑनलाइन शिक्षणात मुलांना त्यांचा कंटाळा येत असल्याने मुलांचा शिक्षणाचा पाया कच्चा राहू शकताे, असे शिक्षणतज्ज्ञ सांगतात.

उमरगा तालुक्यातील वर्गनिहाय विद्यार्थी

पहिली ४१९३

दुसरी ४१३४

तिसरी ४१८७

चौथी ४३७९

पालकांनी घरातच घ्यावी शाळा

ऑनलाइन पद्धतीनेच अभ्यास आणखी काही महिने तरी करू द्यावा. विद्यार्थ्यांना विविध कामांतून, गप्पागाेष्टींतून नवीन संकल्पना व विषय समजून द्यावेेत, असा सल्ला तज्ज्ञांकडून पालकांना दिला जात आहे.

सद्य:स्थितीत काेराेनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी हाेत असला तरी धाेका मात्र टळलेला नाही. सुरक्षेच्या दृष्टिकाेनातून टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा विचार शिक्षण विभाग करीत आहे.

खालच्या वर्गातील विद्यार्थ्यांना तरी शाळेत पाठविणे म्हणजे त्यांची सुरक्षितता धाेक्यात घालण्यासारखे आहे. त्यामुळे लहान विद्यार्थ्यांना घरूनच शिकू द्यावे, असे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

अभ्यास टाळण्यासाठी कारणे अनेक

■अनेकदा मुले ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली गेम खेळताना, कार्टून व्हिडिओ बघताना दिसत असल्याच्या तक्रारी अनेक पालक करीत आहेत. ग्रामीण भागात बऱ्याच अडचणी आहेत.

■अनेक मुले ऑनलाइन वर्गांना बसतात; मात्र शिक्षकांनी सांगितलेला अभ्यास किंवा गृहपाठ करण्यासाठी ती टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येतात.

■प्रत्यक्षात शाळा सुरू असताना किमान चार ते पाच तास शाळेत असणारी ही मुले घरी असताना मात्र कुणीतरी आले, पाणी द्यायचे आहे, भूक लागली आहे, अशी कारणे सांगून वारंवार उठत असतात. ऑनलाइन अभ्यासाचा विद्यार्थी कंटाळा करीत आहेत.

मुलांना अक्षरओळख हाेईना.

■ इंग्रजी, मराठी, गणित, विज्ञान, आदी विषयांच्या विविध क्लिष्ट बाबी ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना समजत नसल्याचे दिसते.

■ ऑनलाइन वर्ग व प्रत्यक्ष शाळांमधील वर्ग यामध्ये प्रचंड तफावत आहे.

■ ऑनलाइन वर्गाला नेटवर्कच्या समस्येमुळे विद्यार्थ्यांना याेग्य ऐकू येत नाही.

■ संकल्पना पूर्णपणे कळत नाहीत.

------------------------------------------

पालकांची अडचण वेगळीच

माझा मुलगा दुसरीच्या वर्गात आहे. मागील वर्ष घरी बसूनच गेले. अनेकांना अक्षर, संख्याओळखही नाही; पण मोबाईल हाताळण्याच्या बाबतीत ही मुले मोठ्या व्यक्तींपेक्षाही पुढे आहेत. सध्या कोरोनाला सोबत घेऊन जीवन जगणे अवगत केले पाहिजे. पालकांनी विद्यार्थ्यांसाठी, अभ्यासासाठी नक्कीच वेळ दिला पाहिजे. शासनाने सर्व विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करणे गरजेचे आहे. अन्यथा पुढील काळात विद्यार्थ्यांच्या बाबतीत अनेक समस्या उद‌्भवू शकतात.

- रवींद्र मुगळे, पालक, उमरगा

माझा मुलगा दुसरीच्या वर्गात शिकत आहे. शाळा सुरू न झाल्याने मुलांचे नुकसान होत आहे. शाऴेमध्ये मुलांना शिस्त, वाचन, पाठांतर, मैत्रीतील मस्ती, समूहाने गायन, वादन, नृत्य या सर्व गोष्टींचा विसर पडत आहे. मोबाईलमुळे डोळ्यांवर परिणाम होत आहे. गावात लाईट, नेटवर्क राहत नाही. शेतकरी कुटुंबात पालक कमी शिकल्यामुळे मुलांना शिकविताना अडचणी येतात.

- कपिल माडजे, मुळज.

Web Title: Chimukalya's holiday mood remains; Forget the study