केंद्र सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:21 IST2021-07-12T04:21:03+5:302021-07-12T04:21:03+5:30

बसवराज पाटील -जिल्हा काँग्रेसची आढावा बैठक संपन्न उस्मानाबाद : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. पेट्रोल, ...

The central government fails on all fronts | केंद्र सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी

केंद्र सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी

बसवराज पाटील -जिल्हा काँग्रेसची आढावा बैठक संपन्न

उस्मानाबाद : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरात प्रचंड दरवाढ करून, केंद्र सरकार सर्वसामान्य जनतेची अक्षरशः लूट करीत आहे, असा आराेप माजी राज्यमंत्री तथा प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी केला.

उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मंचावर मराठवाडा प्रभारी शिवाजीराव मोघे, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, उपाध्यक्ष दिलीप भालेराव, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, महिला काँग्रेसच्या डॉ.स्मिता शहापूरकर, मुरुमच्या नगराध्यक्ष अनिता अंबर, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष सय्यद खलील यांची प्रमुख उपस्थिती हाेती. बसवराज पाटील म्हणाले, देशात महागाईने जनता त्रस्त आहे. बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. कोरोना काळात लोकांची मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे. असे असतानाही केंद्र सरकार व भाजप केवळ राजकारण करण्यात मग्न आहे. या मंडळींना सर्वसामान्य जनतेच्या हिताशी काहीही देणेघेणे नसल्याचा घणाघातही त्यांनी यावेळी केला. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी केले. सूत्रसंचालन शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे यांनी, तर आभार संघटक राजाभाऊ शेरखाने यांनी मानले. बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, भागवतराव धस, विजयकुमार सोनवणे, तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरडे, सरचिटणीस जावेद काझी, हरिभाऊ शेळके, सुरेंद्र पाटील, जि.प.सदस्य रफिक तांबोळी, प्रकाश चव्हाण, ओबीसी जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत, लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील, कळंब तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार, आप्पासाहेब शेळके, परंडा तालुकाध्यक्ष हणमंत वाघमोडे, भूम तालुकाध्यक्ष रूपेशकुमार शेंडगे, वाशी तालुकाध्यक्ष राजेश शिंदे, महिला सरचिटणीस स्नेहल स्वामी, सेवादलाचे प्रणित डिकले, डी.एम.झाडबुके, अजय खरसडे, भूमचे नगरसेवक रोहन जाधव, संजय घोगरे, असंघटित कामगारचे देवानंद येडके, किसान काँग्रेसचे गौरीशंकर मुळे आदी उपस्थित हाेते. यावेळी उस्मानाबाद येथील न्यू भारतीय सेनेचे अध्यक्ष प्रभाकर लोंढे व लोहारा तालुक्यातील हिप्परगा येथील शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

चाैकट...

मराठवाड्यात पक्षवाढीला चांगले वातावरण- शिवाजीराव मोघे

मराठवाडा निरीक्षक, माजी मंत्री शिवाजीराव मोघे म्हणाले की, मराठवाड्यात काँग्रेस पक्ष वाढीला सध्या अनुकूल वातावरण आहे. भाजपने लोकांना भावनिक करून, खोटी आश्वासने देऊन फसविले असल्याची भावना लोकांतून व्यक्त होत आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजुटीने लोकांचे प्रश्न घेऊन वेळोवेळी रस्त्यावर उतरावे.

लोकांसाठी संघर्ष करणे ही काँग्रेसची शिकवण- मधुकरराव चव्हाण

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण म्हणाले, काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता संघर्ष केला. देश उभारणीसाठी संघर्ष केला. लोकांसाठी संघर्ष करणे ही काँग्रेसची शिकवण आहे, त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत लोकांवर अन्याय करणाऱ्या सरकारविरुद्ध काँग्रेस संघर्ष करीत राहील.

Web Title: The central government fails on all fronts