भरधाव जीपची दुचाकीला धडक, एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:34 IST2021-08-23T04:34:50+5:302021-08-23T04:34:50+5:30

उस्मानाबाद -भरधाव जीपने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. ही घटना कळंब तालुक्यातील हावरगाव शिवारात घडली. घटनेनंतर चालकाने वाहनासह ...

Bhardhaw jeep hits two-wheeler, one killed | भरधाव जीपची दुचाकीला धडक, एक ठार

भरधाव जीपची दुचाकीला धडक, एक ठार

उस्मानाबाद -भरधाव जीपने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. ही घटना कळंब तालुक्यातील हावरगाव शिवारात घडली. घटनेनंतर चालकाने वाहनासह घटनास्थळावरून पाेबारा केला. याप्रकरणी संबंधिताविरुद्ध ऑगस्ट राेजी कळंब पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक महिती अशी की, वाशी तालुक्यातील साराेळा (मां.) येथील बाळू आश्रुबा बाेबडे (वय-१९) हे१७ ऑगस्ट राेजी हावरगाव शिवारातील रस्त्याने दुचाकीवरून (क्र. एमएच.२५-एसी. ७३८५) जात हाेते. याचवेळी समाेरून आलेल्या जीपचालकाने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवून दुचाकीला जाेराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार बाेबडे हे गंभीर जखमी हाेऊन मयत झाले. अपघातानंतर नमूद कारच्या चालकाने घटनास्थळावरून वाहनासह पाेबारा केला. या प्रकरणी मयताचा भाऊ श्रीमंत आश्रुबा बाबडे यांनी २१ ऑगस्ट राेजी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात कारचालकाविरुद्ध भादंसंचे कलम २७९, ३०४ (अ) सह माेटार वाहन कायद्याचे कलम १८४, १३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

Web Title: Bhardhaw jeep hits two-wheeler, one killed