अज्ञात वाहनाच्या धडकेत सरवडचा तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 19:05 IST2019-03-27T19:04:13+5:302019-03-27T19:05:47+5:30
हा अपघात आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावर सरवड टोल नाक्याजवळ झाला.

अज्ञात वाहनाच्या धडकेत सरवडचा तरुणाचा मृत्यू
धुळे - अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत धुळे तालुक्यातील सरवड येथील सचिन राजेंद्र बोरसे (३०) हा तरूण ठार झाला. हा अपघात आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावर सरवड टोल नाक्याजवळ झाला.
सचिन बोरसे हा सोनगीर येथून दुचाकीने (क्र. एमएच १८-बीबी ९५९८) सरवडकडे येत होता. सरवड टोलनाक्याजवळील नीळ बनविण्याच्या फॅक्टरीसमोर अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात तो जखमी झाला. योगेश कुलकर्णी, मुकेश पाटील, प्रशांत पाटील, सुमित शिंदे, रवींद्र भामरे, गोविंदा सोनवणे, यांनी त्यास रूग्णवाहिकेतून सोनगीर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शितल शिंदे यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. त्याच्या पश्चात आई, बहिण, भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सोनगीर पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.