शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

प्रेमविवाहाचा असाही शेवट...! पत्नी आणि सासरच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 4:30 PM

Suicide Case : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज हा वेल्डींगचे काम करायचा. पत्नी चंचल ही दीड वर्षाच्या मुलासह दिवाळीला माहेरी गेली आहे.

जळगाव : आई बाजारात असताना घरी कोणी नसल्याचे पाहून पंकज उखर्डू खाचणे (वय २७) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी बारा वाजता गोपाळपुरात उघडकीस आली. पंकज याने आत्महत्येपूर्वी पंकज याने चिठ्ठी लिहिली असून पत्नी, शालक, पोलीस असलेले सासरे व सासू यांच्या छळाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत नमूद आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज हा वेल्डींगचे काम करायचा. पत्नी चंचल ही दीड वर्षाच्या मुलासह दिवाळीला माहेरी गेली आहे. वडिलांचे निधन झालेले आहे, त्यामुळे घरी आई कल्पना व पंकज असे दोघंच होते. आई बळीराम पेठेत भाजी विक्री करते. दुपारी बारा वाजता घरी आली असता दरवाजा आतून बंद होता.

ठोठावल्यारही प्रतिसाद मिळत नसल्याने बहिणीचा मुलगा जयेश हेमराज पाटील (रा.तळेले कॉलनी) याला घरी बोलावून घेतले. शेजारच्यांच्या मदतीने दरवाजा उघडला असता पंकज याने गळफास घेतल्याचे दिसले. यावेळी दीड पानांची चिठ्ठी तेथे आढळून आली. शनी पेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह जीएमसीत हलविला. तत्पूर्वी ही चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली. याप्रकरणी शनी पेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूJalgaonजळगावPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी