Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 20:09 IST2025-05-21T20:07:45+5:302025-05-21T20:09:43+5:30

शंतनू देशमुख हत्या प्रकरणात खळबळजनक खुलासा. पत्नीने पाच दिवस पोलिसांना गुंगारा दिला. पण, अखेर पोलिसांनी तपास करत मुख्याध्यापिकेला बेड्या ठोकल्या.

Yavatmal: Husband was poisoned through juice, body was burnt with the help of students; Principal had formed 'UPSC Mission 2030' group | Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप

Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप

Yavatmal Crime: यवतमाळ जिल्ह्यातील चौसाळा जंगलात १५ मे रोजी जळालेल्या अवस्थेत अज्ञात युवकाचा मृतदेह आढळला होता. मृतदेहाची शवचिकित्सा केल्यानंतर त्या युवकाचा मृत्यू दोन दिवसांपूर्वीच झाल्याचे पुढे आले. यावरून तपासाला गती मिळणे शक्य नव्हते. पोलिसांनी बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू केला. हाती काही लागले नाही. नंतर परिसरातील चर्चेतून मृताची ओळख पटली. खून करण्यासाठी मुख्याध्यापक पत्नीने यूपीएससी मिशन २०३० हा ग्रुप बनवून विद्यार्थ्यांनाच वापरल्याचे पुढे आले. प्रेमविवाहाचा असा भयंकर शेवट समोर आल्याने यवतमाळ जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

एखाद्या थ्रीलर चित्रपटाचे कथानक शोभेल असा घटनाक्रम शंतनू अरविंद देशमुख (वय ३२, रा. सुयोगनगर, दारव्हा रोड, यवतमाळ) खून प्रकरणात पुढे आला आहे. वर्षभरापूर्वी प्रेमविवाह केलेल्या निधी शंतनू देशमुख (२३) हिनेच पतीच्या खुनासाठी थंड डोक्याने व्यूहरचना आखली, यासाठी ती ज्या सनराईज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होती, तेथील विद्यार्थ्यांचा वापर केला. 

पतीला दिले विष, विद्यार्थ्यांची घेतली मदत

मुलांना २०३० मध्ये यूपीएससी उत्तीर्ण करायचे आहे, असे स्वप्न त्यांच्या पालकांना दाखविले. शिक्षिका पुढाकार घेऊन मुलांसाठी पहाटे ४ वाजता मैदानावर येते, याचे अप्रूप पालकांना वाटू लागले. 

वाचा >>"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश

शिक्षिका निधी शंतनू देशमुख हिच्या प्रभावाखाली मुले आली. हत्याकांडाचा कट डोक्यात शिजवलेला असताना तिने पती शंतनूवर विषप्रयोग करून त्याला ठार केले. नंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तीन विद्यार्थ्यांची मदत घेतली. 

त्याकरिता मुलांना पहाटे २ वाजता बोलाविले. तिघांनी दुचाकीवरून शंतनूचा मृतदेह साडी व ब्लॅकेटमध्ये गुंडाळून चौसाळा जंगलात पेटवून तेथेच नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

सोशल मीडिया अकाऊंटवरून शंतनूला ठेवले जिवंत

चौसाळा जंगलात आढळला, तसेच दोन दिवसांपासून दारू गुत्त्यांवर भेटणारा शंतनू का येत नाही, अशी कुजबुज त्याच्या मित्रात सुरू झाली.

फोन कॉल लागत नव्हता. हे बिंग फुटू नये म्हणून निधी देशमुख हिने शंतनूच्या फेसबुक व इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्याच्या मित्रांशी चॅटिंग सुरू ठेवले. इतकेच नव्हे तर तिने स्वतः सोबतही शंतनूच्या अकाऊंटवरून 

सोशल मीडियावर केले चॅटिंग

या आधारावरच शंतनू 3 बेपत्ता असल्याची तक्रार देण्यासाठी गेलेल्या त्याच्या मित्रांना अवधूतवाडी पोलिस ठाण्यातून निधीने परत आणले. त्यामुळे पोलिसांना मिसिंगची तक्रार दाखलच झाली नाही.

शंतनूच्या दारुड्या मित्रांवर संशय अन् सुगावा

पोलिसांना शंतनू बेपत्ता असल्याची चर्चा ऐकायला मिळाली. त्यांनी त्याच्या दारुड्या मित्रांवरच लक्ष केंद्रित केले. त्यात शंतनूच्या एका मित्राकडे त्याचा मंगळवार, १३ मे रोजीचा फोटो मिळाला. 

त्या फोटोतील शर्ट आणि चौसाळा जंगलात मृतदेहाजवळ आढळलेल्या कापडाचा तुकडा मिळताजुळता होता. यामुळे पोलिसांनी शंतनू नेमका कुठे यावर काम करणे सुरू केले. त्यातून पुढील घटनाक्रम उघड झाला.

Web Title: Yavatmal: Husband was poisoned through juice, body was burnt with the help of students; Principal had formed 'UPSC Mission 2030' group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.