शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
3
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
4
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
5
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
6
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
7
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
8
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
9
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
10
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
11
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
12
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
13
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
14
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
15
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
16
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
17
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
18
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
19
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : उद्धव ठाकरेंच्या 'त्या' विधानावरून वंचित उमेदवाराची पोलिसात तक्रार

By पूनम अपराज | Updated: October 17, 2019 17:30 IST

राजकीय वातावरण खूप तापले आहे.

ठळक मुद्देवंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शमशेरखान पठाण यांनी डोंगरी पोलीस ठाण्यात उद्धव ठाकरेंविरोधात लेखी तक्रार दिलीहिंदू - मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याने वंचितच उमेदवार शमशेरखान पठाण यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली

मुंबई - औरंगाबादेत विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या भाषणावेळी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने डोंगरी पोलीस ठाण्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंविरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे. मुंबादेवी विधानसभा मतदार संघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शमशेरखान पठाण यांनी डोंगरी पोलीस ठाण्यात उद्धव ठाकरेंविरोधात लेखी तक्रार दिली असल्याची माहिती डोंगरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भागडीकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.संबंध महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून राजकीय वातावरण खूप तापले आहे. एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करण्यास उधाण आलेले असताना डोंगरी पोलीस ठाण्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. औरंगाबाद येथे झालेल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी हिंदू - मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याने वंचितच उमेदवार शमशेरखान पठाण यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. 

औरंगाबादेत वंचित बहुजन आघाडीचे खासदार इम्तियाज जलील यांना अप्रत्यक्षरित्या हिरवा नाग संबोधित केले. तसेच हिरवा नागाला पाकिस्तानात पाठवून द्या, तिथे त्याची नागपंचमी करा असा समाजात द्वेष निर्माण करणारे वक्तव्य उद्धव यांनी केली असल्याची माहिती शमशेरखान पठाण यांनी दिली. तसेच पुढे ते म्हणाले की, निवडणूक आयोगाने कोणत्याही समाजाबाबत, धर्माबाबत टीका करण्याची मुभा दिलेली नसून उद्धव ठाकरे यांनी समाजात धर्मभेद करण्याऐवजी समाजासाठी काय प्रगती केली ते जनतेला सांगावे. या त्यांच्या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष धोक्यात येऊ शकतो असे पठाण म्हणाले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीAurangabadऔरंगाबादMumbaiमुंबईAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Shiv Senaशिवसेना