शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
3
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
4
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
5
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
6
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
7
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
8
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
9
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
10
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
11
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
12
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
13
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
14
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
15
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
16
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
17
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
18
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
19
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
20
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन

शिक्षिकेने तयार केले विद्यार्थिनींचे अश्लील व्हिडीओ, बिंग फुटताच झाली फरार, अनेक मुलींची प्रकृती बिघडली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2021 9:40 PM

Crime News: एका शिक्षिकेने वसतीगृहातील विद्यार्थिनींचे अनेकदा अश्लील व्हिडीओ बनवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

लखनौ - उत्तर प्रदेशमधील अलिगडमध्ये ठाणे मडराक परिसरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील एका शिक्षिकेवर गंभीर आरोप झाला आहे. या शिक्षिकेने वसतीगृहातील विद्यार्थिनींचे अनेकदा अश्लील व्हिडीओ बनवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच याबाबत कुटुंबीयांकडे तक्रार केल्यास कुटुंबीयांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवले जाईल, अशी धमकी या शिक्षिकेने पीडित मुलींना दिली. दरम्यान, ही माहिती मुलींच्या नातेवाईकांना मिळाली तेव्हा गोंधळ झाला. सर्वजण एकत्र येऊन तक्रार करण्यासाठी वसतीगृहात पोहोचले. त्यानंतर तपास अधिकारीही वसतीगृहात दाखल झाले. मात्र आरोपी शिक्षिका तत्पूर्वीच तिचा मोबाईल घेऊन फरार झाली. आता ही शिक्षिका ते व्हिडीओ फोटो व्हायरल तर करणार नाही ना या भीतीने काही विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली आहे. (Women Teacher makes pornographic videos of students)

विद्यार्थिनींना तातडीने एका स्थानिक खासगी रुग्णालयात आणण्यात आले आहे. या प्रकाराची माहिती मिळताच काही वरिष्ठ अधिकारीही येथे दाखल झाले. त्यानंतर पीडित विद्यार्थिनींना सांगितले की, त्यांना विज्ञान शिकवणारी शिक्षिका रुबी राठोड हिने वसतीगृहात कपडे बदलत असतानाचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ, फोटो तयार केले आहेत. या तक्रारीवर शिक्षिका रुबी राठोड, वॉर्डन आणि गेट-किपरविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. मात्र शिक्षिका रुबी राठोड ही फरार आहे.

आता ही शिक्षिका काढलेले अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करणार तर नाही ना अशी भीती विद्यार्थिनींना सतावत आहे. तसेच वॉर्डनविरुद्ध केलेली कारवाई चुकीची आहे, असा दावाही विद्यार्थिनींनी केला आहे. वॉर्डननी तक्रार करण्यास मदतच केली होती. त्यामुळे त्यांना कामावर परत बोलावले पाहिजे, असे या विद्यार्थिनींनी म्हटले आहे. 

दरम्यान, मुलींच्या प्रकृतीबाबत समजताच रुग्णालयात पोहोचलेल्या नातेवाईकांनी गोंधळ घातला. तसेच आरोपी शिक्षिकेविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी करत मडराह पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. नातेवाईकांनी सांगितले की, मोबाईलमध्ये कसले फोटो आणि व्हिडिओ आहेत हे या शिक्षिकेलाच माहिती आहे. मात्र मुली ज्याप्रकारे घाबरलेल्या आहेत. ते पाहता शिक्षिकेने काही चुकीचे कृत्य करू नये अशी भीती पालकांना वाटत आहे.  तर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तिथे पोहोचलेल्या बीएसए सतेंद्र कुमार ढाका यांनी आता मुलींची तब्येत चांगली असल्याचे सांगत आरोपींविरोधात कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. बीएसए यांनी सांगितले की, जर त्यांच्यापर्यंत या गोष्टींबाबत तक्रार आली तर कारवाई केली जाईल. सध्या काही तक्रारींची दखल घेत कारवाई करण्यात आली आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTeacherशिक्षकUttar Pradeshउत्तर प्रदेश