डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 14:06 IST2026-04-03T14:05:53+5:302026-04-03T14:06:03+5:30

३२ वर्षीय सोनी यादव आणि त्यांच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे आणि मोठ्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे.

Woman, Newborn Die In UP Hospital As Doctor Guides Delivery On Phone | डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू

डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू

अयोध्येतून एक अतिशय हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कोतवाली नगर परिसरातील बल्ला हाता येथील परमेश्वरी देवी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी दरम्यान ३२ वर्षीय सोनी यादव आणि त्यांच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे आणि मोठ्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे.

सोनी यादवचा पती सुरेश यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी पत्नीला डिलिव्हरीसाठी रुग्णालयात दाखल केलं होतं. सुरुवातीला डॉ. अंजली श्रीवास्तव यांनी फोनवर सर्व काही सामान्य असल्याचं सांगून धीर दिला. मात्र वस्तुस्थिती काही वेगळीच होती. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, डिलिव्हरीच्या वेळी रुग्णालयात एकही डॉक्टर हजर नव्हता आणि संपूर्ण डिलिव्हरी केवळ कर्मचाऱ्यांच्या भरवशावर करण्यात आली. डॉक्टर केवळ फोनवरून कर्मचाऱ्यांना सूचना देत होत्या.

फोनवर ऑपरेशनच्या सूचना 

रात्री १२ च्या सुमारास रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी नवजात बाळाला बाहेर आणलं आणि बाळ श्वास घेत नसल्याचं सांगितलं. घाबरलेले नातेवाईक बाळाला तातडीने दुसऱ्या डॉक्टरांकडे घेऊन गेले, पण तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं. काही वेळातच रुग्णालयाने आईची प्रकृतीही गंभीर असल्याची माहिती दिली. तिलाही घाईघाईत दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तिथे डॉक्टरांनी सोनी यादव यांना मृत घोषित केलं.

दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन

या घटनेमुळे नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. योग्य वेळी वैद्यकीय उपचार न मिळाल्याने हा अनर्थ घडल्याचं त्यांचं म्हणणं आहे. या घटनेने छोट्या रुग्णालयांमधील डॉक्टरांची उपस्थिती आणि आरोग्य सेवांच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. अयोध्यापोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. रुग्णालय कर्मचारी आणि डॉक्टरांची चौकशी केली जाईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासनही दिलं आहे.

प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आरोग्य विभागही सक्रिय झाला आहे. एसीएमओ (ACMO) डॉ. आशुतोष श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रुग्णालयावर छापा टाकला. धक्कादायक बाब म्हणजे, निरीक्षणादरम्यान रुग्णालयात एकही डॉक्टर किंवा प्रशिक्षित कर्मचारी आढळला नाही. यानंतर एसीएमओनी तत्काळ कारवाई करत रुग्णालय सील केलं आणि तिथे उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना जिल्हा महिला रुग्णालयात हलवलं आहे.
 

Web Title : डॉक्टर की लापरवाही: फोन पर डिलीवरी, माँ और बच्चे की मौत

Web Summary : अयोध्या में डॉक्टर की लापरवाही से माँ और नवजात शिशु की दर्दनाक मौत। फोन पर डिलीवरी के निर्देश दिए गए, जिससे गंभीर जटिलताएँ हुईं। अस्पताल सील, जाँच जारी।

Web Title : Doctor's Negligence: Mother, Newborn Die After Remote Delivery Instructions

Web Summary : Ayodhya hospital's negligence led to the tragic death of a mother and her newborn. Doctors gave delivery instructions over the phone, leading to fatal complications. The hospital has been sealed, and an investigation is underway.