शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

एकच आंबा खाल्ल्याच्या वादातून महिलेची हत्या; ३ जणांना जन्मठेपेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 9:31 PM

Woman killed for eating a single mango : २९ वर्षे चाललेल्या या खटल्याच्या सुनावणीदरम्यान ४ आरोपींचा मृत्यूही झाला आहे.

संभल : जिल्ह्यातील आंबा खाण्याच्या वादातून महिलेचा खून केल्याप्रकरणी २९ वर्षांच्या सुनावणीनंतर जिल्हा न्यायालयाच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी ३ आरोपींना जन्मठेपेची तर २ आरोपींना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. २९ वर्षे चाललेल्या या खटल्याच्या सुनावणीदरम्यान ४ आरोपींचा मृत्यूही झाला आहे.एका आंब्यावरून वाद झालाआंब्याच्या बागेत अल्पवयीन मुलाने जमिनीवर पडलेला केवळ १ आंबा खाल्ल्याच्या वादातून महिलेचा खून करण्यात आला. हे प्रकरण संभल जिल्ह्यातील बनियाथेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जमालपूर गावचे आहे. सरकारी वकील हरी ओम प्रकाश यांनी सांगितले की, १९९१ मध्ये जमालपूर गावात एका अल्पवयीन मुलाने आंब्याच्या बागेत जमिनीवर पडलेला आंबा खाल्ल्याने दोन गटामध्ये जोरदार भांडण झाले होते. यामध्ये एका बाजूने एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. या मारामारी आणि भांडणात दुसऱ्या बाजूचे अनेकजण जखमी झाले. याप्रकरणी दोन्ही गटाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी दोन्ही गटांच्या लोकांनी न्यायालयात एकमेकांविरुद्ध खटलाही दाखल केला होता. सुमारे २९ वर्षे न्यायालयात खटला सुरू होता.

नवऱ्याच्या नातेवाईकांनी नवरीकडच्या महिलांची काढली छेड, मग लग्नही मोडलंदोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने महिलेच्या हत्येप्रकरणी राम बहादूर, श्योराम आणि भुरा या तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर दुसरीकडे साबीर आणि निजामुद्दीन यांना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा तसेच २०-२० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आंबे खाणाऱ्या अल्पवयीन सूरजलाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले होते, घटनेवेळी सूरज हा अल्पवयीन होता, त्यामुळे सूरजचे प्रकरण अद्याप बाल न्यायालयात प्रलंबित आहे. तर २९ वर्षांपासून न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्याच्या सुनावणीदरम्यान एका गटातील तीन आणि दुसऱ्या गटाच्या एका आरोपीचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीLife Imprisonmentजन्मठेपjailतुरुंगDeathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसCourtन्यायालय