फेसबुकवरील प्रेमासाठी रक्ताचं नातं काळवंडलं; प्रियकरासोबत पाहिलं म्हणून तिने बहिणीलाच संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 09:55 IST2026-03-28T09:54:48+5:302026-03-28T09:55:39+5:30

उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे सख्ख्या बहिणीने प्रियकरासोबत मिळून लहान बहिणीची हत्या केली. प्रेमसंबंध उघड होण्याच्या भीतीने ११ वर्षांच्या अनुष्काचा बळी घेतला.

"Will tell Papa everything": 11-year-old girl murdered by elder sister and boyfriend after being caught in compromising position in Barabanki | फेसबुकवरील प्रेमासाठी रक्ताचं नातं काळवंडलं; प्रियकरासोबत पाहिलं म्हणून तिने बहिणीलाच संपवलं

AI Generated Image

रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातून समोर आली आहे. आपल्या प्रेमसंबंधाचा उलगडा होईल, या भीतीने एका १८ वर्षीय तरुणीने आपल्याच ११ वर्षांच्या लहान बहिणीची निर्घृण हत्या केली. धक्कादायक म्हणजे, या हत्याकांडात तिने आपल्या प्रियकराची साथ घेतली आणि त्यानंतर अपहरणाचा बनाव रचून पोलिसांनाही दिशाहीन करण्याचा प्रयत्न केला.

शेतात काय घडलं?

मोहम्मदपूर खाला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसारी गावात ११ वर्षांची अनुष्का इतर मुलांसोबत शेतात काम करायला गेली होती. तिथेच तिची मोठी बहीण काजल (१८) ही शेजारील गावातील तिचा प्रियकर शिवम (२०) याला गुपचूप भेटण्यासाठी आली होती. हे दोघेही शेतात आक्षेपार्ह अवस्थेत असताना अनुष्काने त्यांना रंगेहाथ पकडले. "मी घरी जाऊन पप्पांना सगळं खरं खरं सांगेन," असं अनुष्का म्हणाली. तिचं हे वाक्य ऐकताच काजल आणि शिवमच्या पायाखालची जमीन सरकली.

पित्याच्या धाकाने उचललं टोकाचं पाऊल

काजलच्या वडिलांना या प्रेमसंबंधाची आधीच कुणकुण लागली होती. त्यांनी काजलचा मोबाईलही तोडला होता आणि तिला बजावून सांगितले होते. त्यामुळे आता अनुष्काने घरी जाऊन सांगितले, तर आपले काही खैर नाही, या भीतीने काजल आणि शिवमने माणुसकी सोडून अनुष्काचा गळा दाबून खून केला.

पोलिसांसमोर रडण्याचं नाटक अन् बनाव

हत्येनंतर काजलने गुन्हेगाराप्रमाणे वागायला सुरुवात केली. तिने घरी जाऊन अनुष्का बेपत्ता झाल्याचा कांगावा केला. पोलीस घटनास्थळी आले तेव्हा ती ढसाढसा रडण्याचं नाटक करत होती. मात्र, पोलिसांनी जेव्हा तिची उलटतपासणी केली, तेव्हा तिच्या बोलण्यात विसंगती आढळली. पोलिसांनी खाक्या दाखवताच काजल कोसळली आणि तिने प्रियकरासोबत मिळून केलेल्या या क्रूर कृत्याची कबुली दिली. अवघ्या २४ तासांच्या आत पोलिसांनी या हत्याकांडाचा छडा लावून काजल आणि शिवम या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. 

Web Title : प्रेम संबंध के लिए खून का रिश्ता कलंकित; बहन की हत्या.

Web Summary : उत्तर प्रदेश में, प्रेम संबंध उजागर होने के डर से, एक 18 वर्षीय लड़की ने अपने प्रेमी की मदद से अपनी 11 वर्षीय बहन की हत्या कर दी। अपहरण का नाटक किया, लेकिन पुलिस ने 24 घंटे के भीतर सच्चाई उजागर कर दी, दोनों को गिरफ्तार किया।

Web Title : Love affair turns deadly: Sister kills sibling for witnessing intimacy.

Web Summary : In Uttar Pradesh, an 18-year-old girl, fearing exposure of her affair, murdered her 11-year-old sister with her lover's help. They staged a kidnapping, but police uncovered the truth within 24 hours, arresting both.