धक्कादायक! ४४ मिनिट पत्नी मृत्यू पाहत राहिली,पतीने इन्स्टाग्रामवर लाईव्ह येऊन जीवन संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 18:19 IST2025-03-21T18:18:40+5:302025-03-21T18:19:04+5:30
पतीने पत्नीला इन्स्ट्रग्रामवर व्हिडीओ कॉल करुन टोकाच पाऊल उचलल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

धक्कादायक! ४४ मिनिट पत्नी मृत्यू पाहत राहिली,पतीने इन्स्टाग्रामवर लाईव्ह येऊन जीवन संपवले
Crime News ( Marathi News ) : उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पतीने इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे इन्स्टाग्रामवर हे लाईव्ह पत्नीही पाहत असल्याचे समोर आले आहे. काही दिवसापूर्वी अतुल-सुभाष यांचे असेच एक प्रकरण समोर आले होते. दरम्यान, आता हे प्रकरणही त्या पद्धतीचे आहे.
"कधीकाळी या बाई पक्षप्रवेशासाठी उद्धव ठाकरेंकडे ...", सुषमा अंधारेंनी चित्रा वाघ यांना डिवचले
एका तरुणाने इंस्टाग्रामवर लाईव्ह येऊन आत्महत्या केली. त्यावेळी त्याची पत्नी देखील लाईव्ह आली आणि तिने ४४ मिनिटे ही घटना पाहिली, पण तिने तिच्या पतीला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. पत्नी आणि सासूच्या छळाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तपासादरम्यान, पोलिसांनी पत्नी आणि तिच्या आईला दोषी ठरवले. यानंतर दोघांनाही अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले.
दोन वर्षापूर्वी लग्न झाले होते
शिवप्रकाश त्रिपाठी यांचे लग्न दोन वर्षांपूर्वी बैकुंठपूरच्या रिमारी गावातील रहिवासी प्रिया शर्मा यांच्याशी झाले होते. सुरुवातीला सगळं व्यवस्थित चाललं होतं, पण काही महिन्यांनी पत्नी दुसऱ्या कोणाशी तरी गुपचूप बोलत होती. शिवप्रकाश यांना या गोष्टीची माहिती मिळाली. पण त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना सांगितले नाही. शिवप्रकाशने प्रत्येकवेळी परिस्थितीत आपले वैवाहिक जीवन वाचवण्याचा प्रयत्न केला. पण, त्याला अपयश आले.
काही दिवसांनी पत्नी प्रिया आपल्या आईच्या घरी गेली. यावेळी शिवप्रकाश तिला पुन्हा परत आणण्यासाठी गेला पण त्यालाही अपयश आले. पत्नी दुसऱ्याच्याच व्यक्तीच्या प्रेमात होती असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तसेच तिने मारहाणही केल्याचा आरोप केला आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी १५ मिनिटे शिवप्रकाश पत्नीला भेटून आला होता. यानंतर तो त्याच्या खोलीत गेला आणि इन्स्टाग्रावर लाईव्ह आला. यानंतर त्याने लाईव्हमध्येच आत्महत्येची तयारी केली. यावेळी धक्कादायक म्हणजे त्याची पत्नी लाईव्ह सर्व पाहत होती. पण, तिने पतीला वाचवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. कुटुंबीयांना फोन करुन कोणतीही माहिती दिली नाही.