खुर्चीला बांधून दिला इलेक्ट्रिक शॉक; पत्नीनेच केला पतीचा खेळ खल्लास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 13:15 IST2021-08-20T13:15:27+5:302021-08-20T13:15:54+5:30

महिलेने ज्याप्रकारे पतीची हत्या केली ते बघून पोलिसही हैराण झाले. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Wife killed husband by giving him electric shock in Bikaner Rajasthan | खुर्चीला बांधून दिला इलेक्ट्रिक शॉक; पत्नीनेच केला पतीचा खेळ खल्लास

खुर्चीला बांधून दिला इलेक्ट्रिक शॉक; पत्नीनेच केला पतीचा खेळ खल्लास

राजस्थानच्या बिकानेरमधून हत्येची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे एका महिलेने तिच्या पतीची शॉक देऊन हत्या केली. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. महिलेने ज्याप्रकारे पतीची हत्या केली ते बघून पोलिसही हैराण झाले. या प्रकरणी अधिक तपास सुरू असून, आरोपी पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, डॉक्टर त्याचा जीव वाचवू शकले नाहीत. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३२ वर्षीय महेंद्र दान नावाच्या व्यक्तीची त्याच्या पत्नीने शॉक देऊन हत्या केली. (हे पण वाचा : Shocking! वडिलांनी खर्च केले १५०० रूपये, नाराज मुलाने केलं हे धक्कादायक कृत्य)

मीडिया रिपोर्टनुसार, महिलेने पतीला रात्रीच्या जेवणावेळी जेवणातून गुंगीचं औषध दिलं. पती बेशुद्ध झाल्यानंतर पत्नीने त्याला खुर्चीवर बसवून त्याचे हात-पाय बांधले आणि त्याच्या पायाला शॉक दिला. त्यानंतर महिलेने दिराला आणि सासऱ्यांना फोन केला. तिने त्यांना सांगितलं की, पतीला शॉक लागला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. परंतु त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपी महिलेने तिचा पती दारुडा असल्याचं सांगितलं. तो रोज मारहाण, शिवीगाळ करत असल्याने ती वेतागली होती. तसंच काही दिवसांपूर्वी पतीने दारुच्या नशेत आपल्या भावाशी भांडण केल्यानेही ती नाराज होती. त्याचाच बदला घेण्यासाठी तिने हे पाउल उचलल्याचं कबूल केलं आहे.
 

Web Title: Wife killed husband by giving him electric shock in Bikaner Rajasthan