पत्नी पतीच्या आत्महत्येचा लाईव्ह व्हिडीओ बनवत राहिली, मृत्यूचे धक्कादायक कारण आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 10:27 IST2025-05-16T10:21:40+5:302025-05-16T10:27:37+5:30

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मध्यरात्री एका तरुणाने राहत्या घरीच आत्महत्या केल्याचे समोर आले.

Wife kept making live video of husband's suicide, shocking cause of death revealed | पत्नी पतीच्या आत्महत्येचा लाईव्ह व्हिडीओ बनवत राहिली, मृत्यूचे धक्कादायक कारण आले समोर

पत्नी पतीच्या आत्महत्येचा लाईव्ह व्हिडीओ बनवत राहिली, मृत्यूचे धक्कादायक कारण आले समोर

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मध्यरात्री एका तरुणाने राहत्या घरीच आत्महत्या केल्याचे समोर आले. यावेळी त्याची पत्नीही उपस्थित होती. पण पत्नीने पतीला वाचवले नाही, पत्नी खोलीबाहेर उभी राहून संपूर्ण घटनेचा व्हिडीओ बनवत होती. गुरुवारी पत्नी सर्वेशने तिच्या सासरच्यांना फोन करून अर्जुनच्या मृत्यूची माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. तरुणाच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे की, अर्जुन कष्टाचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याचे लग्न १३ वर्षांपूर्वी सर्वेशशी झाले होते, पण गेल्या काही काळापासून सून सर्वेशचे नोएडा येथील अनिकेत नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते.

बांगलादेशींना भारतीय जन्मदाखला बनवून देणारा कर्नाटकात जेरबंद

महिनाभरापूर्वी पत्नी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. सून सर्वेश अर्जुनला सतत मानसिक त्रास देत असे आणि त्यामुळे अर्जुन तणावाखाली होता, असा आरोप तरुणाच्या वडिलांनी केला. 

वडिलांनी मुलाच्या आत्महत्येसाठी आपल्या सुनेला जबाबदार धरले आहे, सुनेवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी मृताची पत्नी सर्वेश हिला ताब्यात घेतले आहे आणि तिची चौकशी सुरू केली आहे. या दाम्पत्याला दोन मुले आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ज्यावेळी तरुण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता त्यावेळी खोलीचा दरवाजा आतून बंद होता. महिलेने  व्हिडीओ गावकऱ्यांनी दरवाजा उघडल्यानंतर केला असावा.  या प्रकरणात चौकशी करू.

Web Title: Wife kept making live video of husband's suicide, shocking cause of death revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.