पतीच्या बेडरूममध्ये दुसरी महिला पाहिल्यानंतर पत्नीने केला High Voltage हंगाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 15:45 IST2021-07-29T15:44:39+5:302021-07-29T15:45:18+5:30
Wife Caught Another women in Husband's Bedroom : मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे अधिकारी अभय कुमार आणि त्याच्या पत्नीमध्ये गेल्या काही वर्षांपासून दुरावा आहे, त्यामुळेच त्याची पत्नी आपल्या मुलांसोबत रामगढमध्ये राहत असताना तिचा पती येथे एकटा राहत होता.

पतीच्या बेडरूममध्ये दुसरी महिला पाहिल्यानंतर पत्नीने केला High Voltage हंगाम
झारखंड - डालटनगंज रेल्वेमध्ये कार्यरत वरिष्ठ पीडब्ल्यूआय अभय कुमार सिन्हा यांच्या अधिकृत क्वार्टरमध्ये काही दिवस त्याच्यासोबत एक मैत्रीण होती. सिन्हा यांची पत्नी मुलांसह रामगढमध्ये राहत होती. अचानक, जेव्हा पत्नी तिच्या नवऱ्याच्या अधिकृत क्वार्टरला पोहोचली तेव्हा तिला बेडरुममध्ये एक दुसरी महिला दिसली, त्यानंतर पत्नीने रागाच्या भरात तिला हाणामारी केली, त्या दोघांमध्ये जोरदार भांडण झाले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे अधिकारी अभय कुमार आणि त्याच्या पत्नीमध्ये गेल्या काही वर्षांपासून दुरावा आहे, त्यामुळेच त्याची पत्नी आपल्या मुलांसोबत रामगढमध्ये राहत असताना तिचा पती येथे एकटा राहत होता. जेव्हा पत्नी त्यांच्या अधिकृत क्वार्टरला पोहोचली तेव्हा तिला बेडरुममध्ये आणखी एक महिला आढळली, त्यानंतर हा सर्व हाय व्होल्टेज हंगामा सुरू झाला. या संपूर्ण प्रकरणात रेल्वे कर्मचारी अभय सिन्हा यांचे म्हणणे आहे की, त्यांची मैत्रीण त्यांच्याबरोबर काही वैयक्तिक कामासाठी राहत होती, त्यामुळे त्यांच्या पत्नीचा गैरसमज झाला आहे. या प्रकरणात सिन्हा यांच्या पत्नीने मेदिनीनगर महिला पोलिस स्टेशन गाठले आणि तक्रार दिली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.