बॉयफ्रेंडच्या मदतीने हत्या केली, ढसाढसा रडली; कुटुंबाला संशय, पुरलेला मृतदेह बाहेर काढला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 16:27 IST2025-11-27T16:26:29+5:302025-11-27T16:27:22+5:30
एका ३२ वर्षीय पुरूषाची त्याच्या पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंडने गळा दाबून हत्या केल्याचा गंभीर आरोप आहे.

फोटो - जनसत्ता
गुजरातच्या वडोदरामधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ३२ वर्षीय पुरूषाची त्याच्या पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंडने गळा दाबून हत्या केल्याचा गंभीर आरोप आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, घातपाताचा संशय आल्यानंतर कुटुंबाने पुरलेला मृतहेद पाच दिवसांना बाहेर काढला आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये व्यक्तीची हत्या झाल्याचं उघड झालं.
इर्शाद अब्दुल करीम बंजारा याचा १८ नोव्हेंबर रोजी संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. सुरुवातीला त्याच्या कुटुंबाने ही घटना अपघाती मृत्यू वाटली. पण त्यानंतर इर्शादच्या पत्नीच्या वागण्याने कुटुंबाचा संशय आणखी वाढला. या कठीण काळात पत्नी दुःखी किंवा अस्वस्थ दिसत नव्हती, ज्यामुळे कुटुंबाला वेगळीच शक्यता वाटली. यानंतर कुटुंबाने आरोप केला की, पत्नीने तिच्या बॉयफ्रेंड आणि त्याच्या मित्रासह इर्शादची हत्या केली.
कुटुंबाने न्यायाची मागणी करत पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. तक्रार मिळाल्यानंतर आणि गंभीर आरोपांची चौकशी केल्यानंतर, पोलिसांनी ताबडतोब प्रकरणाचा तपास सुरू केला. आरोपांचं गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी पाच दिवसांनी मृतदेह बाहेर काढला. मृत्यूचं खरं कारण निश्चित करण्यासाठी मृतदेह गोत्री रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला.
गुन्हा कसा झाला आणि कोण यात सामील होते हे निश्चित करण्यासाठी तपास सुरू करण्यात आला. इर्शादच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी ढसाढसा रडली होती. वैद्यकीय तपासणीत नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू नाकारला गेला आणि त्याऐवजी इर्शादचा मृत्यू गळा दाबून झाल्याची पुष्टी झाली. हत्येची पुष्टी झाल्यानंतर, पोलिसांनी इर्शादची पत्नी, तिचा बॉयफ्रेंड आणि मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.