"तू आई-वडिलांना छोट्या गोष्टी..."; फिजिओथेरपिस्टचा होणाऱ्या नवऱ्याला मेसेज, का संपवलं आयुष्य?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 10:15 IST2025-11-23T10:14:42+5:302025-11-23T10:15:50+5:30

२१ नोव्हेंबर रोजी अचानक असं काही घडलं की राधिकाने आपलं आयुष्यच संपवलं.

why physiotherapist radhika ended life surat jump 9th floor engagement | "तू आई-वडिलांना छोट्या गोष्टी..."; फिजिओथेरपिस्टचा होणाऱ्या नवऱ्याला मेसेज, का संपवलं आयुष्य?

"तू आई-वडिलांना छोट्या गोष्टी..."; फिजिओथेरपिस्टचा होणाऱ्या नवऱ्याला मेसेज, का संपवलं आयुष्य?

गुजरातच्या सूरत येथील २८ वर्षीय फिजिओथेरपिस्ट डॉ. राधिकाच्या आत्महत्येने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. दोन महिन्यांनंतर राधिकाचा साखरपुडा आणि लग्न होणार होतं. कुटुंबीय जोरदार तयारी करत होते आणि राधिकाही खूप आनंदी होती. पण २१ नोव्हेंबर रोजी अचानक असं काही घडलं की राधिकाने आपलं आयुष्यच संपवलं. ९ व्या मजल्यावरून उडी मारली.

२१ नोव्हेंबर रोजी राधिका कॅफेमध्ये पोहोचली. कॅफे कर्मचारी कोबिद अली याने दिलेल्या माहितीनुसार, तिने चहाची ऑर्डर दिली, नंतर पाण्याची बाटली आणि एक ग्लास मागितला. ती जवळपास २० मिनिटं पूर्णपणे नॉर्मल दिसत होती. ती फोनवर बोलत होती. कर्मचारी किचनमध्ये गेल्यावर राधिका अचानक तिच्या खुर्चीवरून उठली, रेलिंगवर चढली आणि सरळ खाली उडी मारली.

कुटुंबाला मोठा धक्का

मोठा आवाज ऐकून कॅफे आणि आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. राधिकाच्या डोक्याला आणि शरीरावर गंभीर दुखापत झाली. तिचा जागीच मृत्यू झाला. राधिकाचा साखरपुडा आणि लग्न जानेवारी २०२६ मध्ये होणार होतं. मात्र लग्नाच्या फक्त दोन महिने आधी राधिकाने घेतलेल्या निर्णयामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

"तू तुझ्या आई-वडिलांना छोट्या गोष्टी सांगू नकोस"

पोलीस तपासात असं दिसून आलं आहे की, आत्महत्येपूर्वी राधिकाने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला व्हॉट्सेप मेसेज पाठवला होता... "तू तुझ्या आई-वडिलांना छोट्या छोट्या गोष्टी सांगू नकोस..." यामुळेच दोघांमध्ये काहीतरी तणाव असल्याचं म्हटलं जातं. दोघंही नियमित एकमेकांना व्हॉइस आणि व्हिडीओ कॉल करत होते. पोलीस आता फोनवरील चॅट्स आणि कॉल रेकॉर्ड तपासत आहेत.

जवळपास २० मिनिटं फोनवर बोलली

२१ नोव्हेंबर रोजी, राधिका नेहमीप्रमाणे सकाळी क्लिनिकमध्ये गेली, नंतर दुपारी घरी परतली आणि परत क्लिनिकला गेली. त्यानंतर ती थेट गेली, जिथे ती तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत अनेकदा जात असे. राधिकाने जवळपास २० मिनिटं फोनवर बोलली आणि त्यानंतर अचानक रेलिंगवर चढून उडी मारली, ज्यामुळे तिथे असलेल्या सर्वांनाच धक्का बसला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Web Title: why physiotherapist radhika ended life surat jump 9th floor engagement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.