शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

"अजून लग्न का नाही केलं?.." या प्रश्नानं चिडलेल्या व्यक्तीनं शेजाऱ्याची केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 18:24 IST

एखाद्या क्षुल्लक प्रश्नावरून संतापलेल्या एका व्यक्तीनं शेजारी राहणाऱ्याची क्रूरपणे हत्या केली आहे. 

अनेकदा जर कुणी अनोळखी व्यक्ती भेटले, ट्रेनचं उदाहरण घेतलं तर तिथे अनोळखी एकमेकांना भेटतात. सुरुवातीच्या ओळखीत नाव, नोकरी आणि शहर याची विचारणा होते. काही वेळा लग्न झालंय की नाही असा प्रश्नही ऐकायला मिळतो. झालं असेल तर ठीक नसेल झालं तर लग्न का झालं नाही असंही विचारलं जाते. मात्र लग्नाच्या याच प्रश्नामुळे कुणी इतका दुखी आणि नाराज असू शकतो ज्यामुळे तो एखाद्याची हत्या करेल अशी कल्पनाही कुणी करणार नाही.

इंडोनेशियात घडलेल्या अशाच एका प्रकारानं सर्वच हैराण झाले आहे. सोशल मीडियावर हा चर्चेचा विषय बनला आहे.  स्थानिक वृत्तानुसार, इंडोनेशियातील साऊथ तपानुली प्रांतात २९ जुलैच्या रात्री धक्कादायक घटना घडली, ज्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. ४५ वर्षीय पारलिंदुंगन सिरगारनं त्याच्या शेजारी राहणाऱ्या ६० वर्षीय असगिम इरियंटोची निर्घृण हत्या केली आहे. या हत्येमागचं कारण इतकं क्षुल्लक होतं जे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. एक साधा प्रश्न, तुमचं लग्न का नाही झालं?

२९ जुलैच्या रात्री ८ वाजता पारलिंदुंगन सिरगार असगिम इरियंटो यांच्या घरी हातात एक लाकडाचा तुकडा घेऊन पोहचला. त्याठिकाणी काहीही न बोलता त्याने असगिमवर हल्ला केला. या हल्ल्यामुळे असगिम पळत पळत रस्त्यावर आल्या परंतु आरोपीने त्यांचा पाठलाग करत डोक्यावर वार केले. या हल्ल्यात असगिम यांचा जीव गेला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. तिथे आरोपीला ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत आरोपीने केलेला दावा ऐकून पोलीस अधिकारी चक्रावले.

चौकशीत आरोपी पारलिंदुंगनने म्हटलं की, असगिम वारंवार माझ्या लग्नाबाबत प्रश्न विचारत असल्यानं मी नाराज होतो. लग्नावरून मस्करी करणं पसंत नव्हते त्यामुळे असगिमला मारण्याचं ठरवलं असं त्याने पोलिसांना सांगितले. असगिमची क्रूरपणे हत्या करण्यामागे कारण होतं ते म्हणजे असगिम सातत्याने पारलिंदुंगनला मस्करीनं तुझं अजून लग्न का झालं नाही असा सवाल विचारत होता. त्याचाच राग डोक्यात ठेवत आरोपीने असगिमवर हल्ला केला. 

दरम्यान, या घटनेमुळे इंडोनेशियात खळबळ माजली आहे. आपण केलेल्या मस्करीचा आणि लग्नाबाबत विचारलेल्या सवालामुळे कुणी इतक्या क्रूरपणे हत्या करू शकते का असा सवाल लोकांना पडला आहे. एखाद्याचं बोलणं कधी मनाला इतकं लागतं, ज्यामुळे समोरच्याचा काटा काढायचा गंभीर विचार येऊ शकतो असा विचार लोकांना करायला या घटनेनं भाग पाडलं आहे. सोशल मीडियावर या मुद्द्यावर अनेकजण आपापली भूमिका मांडत आहेत.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी