पत्नी घरी नसताना शेजारच्या तरुणीला घरात बोलवून केला बलात्कार   

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 14:22 IST2021-06-10T14:21:25+5:302021-06-10T14:22:55+5:30

Rape case :पारडीतील घटना : आरोपी गजाआड 

When his wife was not at home, he called the girl who is staying neighbour and raped her | पत्नी घरी नसताना शेजारच्या तरुणीला घरात बोलवून केला बलात्कार   

पत्नी घरी नसताना शेजारच्या तरुणीला घरात बोलवून केला बलात्कार   

ठळक मुद्दे  तक्रार करणारी तरुणी १९ वर्षांची आहे. ती पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते.  विलंबाचे कारण गुलदस्त्यात तरुणीने बलात्काराची तक्रार नोंदविण्यासाठी एवढा उशीर का केला, ते स्पष्ट झाले नाही. या संबंधाने उलट सुलट चर्चा सुरू आहे.

नागपूर : पत्नी घरी नसताना शेजारच्या तरुणीला घरात बोलवून तिच्याशी शरीरसंबंध जोडणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली बुधवारी अटक केली.


 तक्रार करणारी तरुणी १९ वर्षांची आहे. ती पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. तिच्या शेजारीच आरोपी अमोल शामराव ठाकरे (वय ३१) राहतो. तो भाजीपाला विकतो. तरुणीच्या तक्रारीनुसार, पत्नी बाहेरगावी गेली की अमोल सदर तरुणीला घरात बोलवून तिच्याशी शरीर संबंध जोडायचा. १ डिसेंबर २०२० ते १२ एप्रिल २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला. त्यानंतर त्यांच्याच खटके उडायला सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर, सदर तरुणीने बुधवारी पारडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून अमोल ठाकरे विरुद्ध बलात्काराचा आरोप लावला. पोलीस उपनिरीक्षक शरद शिंपणे यांनी तरुणीच्या तक्रारीवरुन बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे.



विलंबाचे कारण गुलदस्त्यात तरुणीने बलात्काराची तक्रार नोंदविण्यासाठी एवढा उशीर का केला, ते स्पष्ट झाले नाही. या संबंधाने उलट सुलट चर्चा सुरू आहे.

Web Title: When his wife was not at home, he called the girl who is staying neighbour and raped her