कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करून लग्नसोहळ्याचे आयोजन, गर्दी झाली, नाचगाणीही रंगली, आता पोलिसांनी अशी कारवाई केली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 08:04 PM2021-07-16T20:04:27+5:302021-07-16T20:05:41+5:30

Coronavirus: कोरोना निर्बंधांचे सर्रास उल्लंघन करून भाईंदरच्या एका खाजगी सभागृहात दोन दिवस चाललेल्या लग्न सोहळा , नाचगाण्या प्रकरणी भाईंदर पोलिसांनी आयोजक व हॉल मालक आदींवर गुन्हा दाखल केला आहे

The wedding was organized in violation of the rules of corona, there was a crowd, there was dancing, now the police took such action. | कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करून लग्नसोहळ्याचे आयोजन, गर्दी झाली, नाचगाणीही रंगली, आता पोलिसांनी अशी कारवाई केली

कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करून लग्नसोहळ्याचे आयोजन, गर्दी झाली, नाचगाणीही रंगली, आता पोलिसांनी अशी कारवाई केली

Next

मीरारोड - कोरोना निर्बंधांचे सर्रास उल्लंघन करून भाईंदरच्या एका खाजगी सभागृहात दोन दिवस चाललेल्या लग्न सोहळा , नाचगाण्या प्रकरणी भाईंदर पोलिसांनी आयोजक व हॉल मालक आदींवर गुन्हा दाखल केला आहे . विशेष म्हणजे या कार्यक्रमास आजी - माजी आमदार , नगरसेवक , राजकारण्यांनी हजेरी लावली असताना त्यांनी सुद्धा या उल्लंघना कडे काणाडोळा केला . (The wedding was organized in violation of the rules of coronavirus, there was a crowd, there was dancing, now the police took such action.)

 रायपूर धनलक्ष्मी जनसेवा ट्रस्टने ११ जोडप्यांचे विवाह सोहळ्याचे आयोजन भाईंदर पश्चिमेस उड्डाणपुलाचे जवळ असणाऱ्या व्यंकटेश हॉल मध्ये बुधवार व गुरुवार असे दोन दिवस केले होते . या कार्यक्रमासाठी वर्गणी , देणगी देण्याचे जाहीर आवाहन करत ती गोळा केली होती . 

कोरोना संसर्गाचा धोका पाहता लग्न समारंभावर मर्यादा असताना देखील आयोजक व उपस्थितांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती . बहुतेकांनी तर मास्क घातले नव्हते . गाण्यांवर अनेकांनी नाच केला . त्यातच उल्लंघन करून सुरु असलेल्या या समारंभास आमदार गीता जैन , माजी आमदार नरेंद्र मेहतांसह अनेक नगरसेवक , राजकारणी यांनी हजेरी लावून राजकीय चमकोगिरी करताना नियमांच्या उल्लंघना कडे जाणीवपूर्वक काणाडोळा केला . महापालिकेचे पथक - कर्मचारी सुद्धा ह्या उल्लंघना कडे पाठ फिरवून होते. 

दरम्यान गुरुवारी भाईंदर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुगुट पाटील यांच्या कडे ह्या बाबतची माहिती मिळताच त्यांनी पोलीस कर्मचारी रवींद्र वाणी यांना घटनास्थळी जाऊन पाहणी  करण्यास सांगितले . हॉल मध्ये प्रचंड गर्दी व कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्या नंतर वाणी यांच्या फिर्यादी वरून  कविता कल्पेश सरय्या, धर्मेंद्र लक्ष्मीचंद शर्मा , संजय शामराव दळवी आणि कमलाकर रमाकांत कांदळगावकर यांच्या सह लग्नासाठी इतर १२५ ते १५० लोकांवर बेकायदा जमाव बनवून शासनांच्या नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: The wedding was organized in violation of the rules of corona, there was a crowd, there was dancing, now the police took such action.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.