Viral video girl mentally tortured by youth police register complaint Bareilly | माथेफिरू आशिक! रक्ताने भिजलेले पत्र, सुसाइडची धमकी...लग्न मोडलं म्हणून तरूणाने तरूणीचं जगणं केलं हैराण!

माथेफिरू आशिक! रक्ताने भिजलेले पत्र, सुसाइडची धमकी...लग्न मोडलं म्हणून तरूणाने तरूणीचं जगणं केलं हैराण!

यूपीच्या बरेलीमधील एका माथेफिरू प्रियकराने एका मुलीचं जगणं हैराण केलं आहे. तो तिला कधी रक्ताने माखलेले फोटो पाठवतो तर तेच फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. तर कधी तिच्या घरी जाऊन आत्महत्या करून तिला फसवण्यासाची धमकी देतो. अखेर वैतागलेल्या तरूणीने पोलिसात तक्रार दिली. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.

बरेलीच्या कोहाडापीर भागातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एक तरूण रक्ताने माखलेला आहे आणि आरोप लावत आहे की, पोलिसांनी मारून मारून त्याची अशी हालत केली आहे. तो म्हणाला की, पोलिसांनी काही लोकांच्या सांगण्यावरून त्याला मारहाण केली. त्यामुळे त्याला आत्महत्येसारखं पाउल उचलण्याशिवाय दुसरा मार्ग राहिला नाही. (हे पण वाचा : पत्नीच्या अफेअरला कंटाळून पतीने स्वत:वर झाडली गोळी, आत्महत्येपूर्वी व्हिडीओ केल शेअर!)

आरोपीने प्रियकराने हा कथित आत्महत्येच्या प्रयत्नाचा व्हिडीओ बनवला आहे. व्हिडीओत तो म्हणाला की, 'माझं एका मुलीवर प्रेम आहे. तिचंही माझ्यावर प्रेम आहे. आम्हा दोघांचं लग्न होणार होतं. पण काही लोकांना हे आवडलं नाही. त्यांनी माझ्या प्रेयसीवर माझ्यासोबत लग्न करण्याचा दबाव टाकला. सोबतच माझ्या विरोधात पोलिसात तक्रार दिली.

त्यानंतर पोलिसांनी मला मारहाण केली. माझ्या प्रेयसीला मला भेटू दिलं गेलं नव्हतं. मी तिच्याशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. यासाठी मंटू, बिबाल आणि बंटू जबाबदार आहे'. इतकं बोलून मोनिसने काही गोळ्या खाल्ल्या. मोनिसचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

पण या घटनाक्रमात महत्वपूर्ण भूमिका तरूणीची आहे. तरूणीचं आणि मोनिसचं प्रेमप्रकरण सुरू होतं. सगळं काही ठीक सुरू होतं. दोघांचं लग्नही होणार होतं. पण अशात मुलीच्या घरच्या लोकांना समजलं की, मोनिस नशा करतो. त्यामुळे त्यांना लग्न मोडलं. त्यानंतरही मोनिस लग्न करण्याचा हट्ट करत राहिला. त्यामुळे मुलीच्या घरच्यांनी पोलिसांची मदत घेतली. त्यांनी पोलिसांना सांगितले की,  मुलगा नशा करतो आणि आम्हाला त्रास देतो त्यामुळे हे नातं आता संपलं आहे. 

एसपी सिटी म्हणाले की, एका व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका मुलीने तक्रार दिली होती. तरूण-तरूणीची साखरपुडा झाला होता. पण मुलगा नशा करत होता त्यामुळे हे लग्न मोडलं होतं. तशी बोलणीही झाली होती. त्यानंतरही तरूण तरूणीला त्रास देत आहे. ज्याची तक्रार तरूणीने दुसऱ्यांदा केली आहे. तसेच त्याने पोलिसांवर लावलेला मारझोडीचा आरोपही खोटा आहे.
 

Web Title: Viral video girl mentally tortured by youth police register complaint Bareilly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.