पोलिसांना धारेवर धरणाऱ्या  महिलेचा व्हिडिओ व्हायरल, उलट-सुलट चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 11:17 PM2021-03-18T23:17:02+5:302021-03-18T23:18:07+5:30

Nagpur News : कारवाईसाठी सरसावलेल्या वाहतूक पोलिसांना दमदाटी करत एका महिलेने चांगलाच गोंधळ घातला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे शहरात काही वेळ चांगलीच खळबळ उडाली होती.

The video of the woman holding the police on edge went viral, sparking a heated debate | पोलिसांना धारेवर धरणाऱ्या  महिलेचा व्हिडिओ व्हायरल, उलट-सुलट चर्चेला उधाण

पोलिसांना धारेवर धरणाऱ्या  महिलेचा व्हिडिओ व्हायरल, उलट-सुलट चर्चेला उधाण

Next

नागपूर : कारवाईसाठी सरसावलेल्या वाहतूक पोलिसांना दमदाटी करत एका महिलेने चांगलाच गोंधळ घातला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे शहरात काही वेळ चांगलीच खळबळ उडाली होती.
 
घटना गुरुवारी दुपारी शहीद चौक इतवारीत घडली. डबल सीट दुचाकीवर येताना पाहून शहीद चौकात वाहतूक पोलिसांनी एका महिलेला थांबण्याचा साठी हात दाखवला. मात्र पोलिसांना न जुमानता ती सुसाट वेगाने पुढे निघून गेली. संशय आल्यामुळे पोलिसांनी तिचा पाठलाग केला त्यामुळे ती घाबरली आणि बाजुच्या गल्लीत दुचाकी घसरून पडली. दरम्यान, पोलीस तेथे पोहोचले  त्यांनी तिला पळून जाण्याचे कारण विचारले  तिने पोलिसांना उत्तर देण्याऐवजी त्यांना चांगलेच फैलावर घेतले. माझ्याकडे मास्क आहे,  हेल्मेट आणि परवानाही आहे. त्यामुळे तुम्ही मला थांबवलेच कसे, अशी विचारणा करून महिलेने वाहतूक शाखेच्या पोलिसांना धारेवर धरले. ती मोठमोठ्याने ओरडू लागली.

दरम्यान, पोलिसांनी तहसील ठाण्यात माहिती देऊन मदत मागवली. मोठ्या प्रमाणात पोलिस आल्यामुळे बिथरलेल्या महिलेने बाजूच्या खड्डे कडे धाव घेतली. एका पोलिसांनी तिला कसेबसे तेथून दुचाकी जवळ आणले. त्यामुळे नंतर तिने दुचाकीचे डिक्की खोलून त्यातून बाटली काढली आणि पेट्रोल अंगावर घेऊन आत्महत्या करतो, असे मनात गोंधळ घातला. तिच्या या पवित्र्यामुळे पोलीस हादरले. काही पोलीस आणि गर्दी करणाऱ्या नागरिकांनीही तिला समजावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, महिला पोलिसांनी त्या त्या महिलेला आणि तिच्या मुलीला ताब्यात घेऊन तहसील ठाण्यात नेले. येथे ठाणेदार जयेश भांडारकर यांनी तिची आणि वाहतूक पोलिसांची बाजू ऐकून घेतली. त्यानंतर प्रकरण अदखलपात्र (एनसी)करीत तिला समज देऊन घरी पाठविण्यात आले. दरम्यान, या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे काही वेळ शहरात चांगलीच खळबळ उडाली होती.
---

Web Title: The video of the woman holding the police on edge went viral, sparking a heated debate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.