Video : Vikas Dubey Encounter : गुंड विकास दुबेचा एन्काउंटर खरा की स्क्रिप्टेड?; चकमक फेम प्रदीप शर्मा म्हणाले...

By पूनम अपराज | Published: July 10, 2020 05:29 PM2020-07-10T17:29:04+5:302020-07-10T17:32:59+5:30

१३ ते १४ तास उज्जैन ते कानपुर गाडी चालवून नक्कीच पावसात तो चालक थकला असेल.त्यामुळे गाडी स्किट झाली, पलटी झाली आणि अपघात झाला. त्यावेळी त्याने पोलिसांची पिस्तूल हिसकावून त्याने पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला असेल, तशी दुबेला पोलिसांवर गोळीबार करण्याची सवय आहेच, अशी शर्मा यांनी सांगितले.   

Video :Vikas Dubey Encounter : Hooligan Development Dubey's Encounter True or Scripted ?; Flint fame Pradip Sharma said ... | Video : Vikas Dubey Encounter : गुंड विकास दुबेचा एन्काउंटर खरा की स्क्रिप्टेड?; चकमक फेम प्रदीप शर्मा म्हणाले...

Video : Vikas Dubey Encounter : गुंड विकास दुबेचा एन्काउंटर खरा की स्क्रिप्टेड?; चकमक फेम प्रदीप शर्मा म्हणाले...

googlenewsNext
ठळक मुद्दे उत्तर प्रदेश पोलिसांनी कुख्यात गँगस्टर विकास दुबेचा इन्काउंटरमध्ये खात्मा केला आहे.मुंबई पोलिसात एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेले प्रदीप शर्मा यांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले आहे.

पूनम अपराज

आज सकाळी ६.४० वाजताच्या सुमारास कुख्यात गुंड विकास दुबेचा यूपी पोलिसांनी खात्मा केला. या एन्काउंटरबाबत बोलताना चकमक फेम प्रदीप शर्मा यांनी माहिती दिली की, विकास दुबेचा एन्काउंटर हा जेन्यूअन आहे. समाजातील अशा नराधमाला, राक्षसाला मारायलाच पाहिजे. या युपी पोलिसांच्या धाडसी कारवाईबद्दल शर्मा यांनी त्यांचे कौतुक आणि अभिनंदन केले. त्यांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता भविष्यात अशीच कारवाई करावी, १३ ते १४ तास उज्जैन ते कानपुर गाडी चालवून नक्कीच पावसात तो चालक थकला असेल.त्यामुळे गाडी स्किट झाली, पलटी झाली आणि अपघात झाला. त्यावेळी त्याने पोलिसांची पिस्तूल हिसकावून त्याने पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला असेल, तशी दुबेला पोलिसांवर गोळीबार करण्याची सवय आहेच, अशी शर्मा यांनी सांगितले. 

 
उत्तर प्रदेश पोलिसांनी कुख्यात गँगस्टर विकास दुबेचा इन्काउंटरमध्ये खात्मा केला आहे. ज्या प्रकार पोलिसांनी विकास दुबेचं एन्काउंटर खरं की खोटं यावरून अनेक सवाल उपस्थितीत झाले आहे. मात्र, मुंबई पोलिसात एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेले प्रदीप शर्मा यांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले आहे. आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या विकास दुबेचे एन्काउंटर होणे हे साहजिकच आहे. त्याच्यावर उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेली कारवाई ही योग्य आहे, असं मत प्रदीप शर्मा यांनी व्यक्त केले.
 

या कुख्यात गुंडाने ८ पोलिसांची हत्या केली तेव्हा कोणी सामाजिक कार्यकर्ता मानवधिकार आयोगाकडे जात नाही. अपघातानंतर दुबेनं पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि ४ पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला असेल, त्यामुळे स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी एन्काउंटर केला असेल आणि त्यात तो मारला गेला.', मानव हक्क कार्यकर्त्याबद्दल मला बोलायचंय ८ पोलिसांची हत्या केली तेव्हा कुठे होते, आता हा एन्काउंटर झाला तेव्हा ते आवाज उठवतील, असे देखील प्रदीप शर्मा म्हणाले.
 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

विकास दुबेची नेपाळ सीमेवर शोधाशोध; प्रत्येक भिंतीवर 'मोस्ट वॉन्टेड'चे पोस्टर

 

पीएमसी बँक घोटाळ्यानंतर तणावात असलेल्या महिलेने सुशांतच्या आत्महत्येनंतर संपवले आयुष्य

 

किळसवाणा प्रकार! गायीसोबत अतिप्रसंग करत होता इसम, CCTV मध्ये रेकॉर्ड झाला व्हिडीओ

 

मृत्यूचा सूड! बापरे, एका वृद्धानं महिलेचं शिर कापून पोलीस ठाण्यात घेऊन गेला अन् म्हणाला...

 

नग्न महिलेचे तुकडे तुकडे करून सुटकेस अन् मुंडकं प्लास्टिक बॅगेत ठेवलं 

 

कोरोनाबाधित रुग्णांची नावे जाहीर करण्याची मागणी कशासाठी? याचिकाकर्त्याला न्यायालयाचा उलट सवाल

Web Title: Video :Vikas Dubey Encounter : Hooligan Development Dubey's Encounter True or Scripted ?; Flint fame Pradip Sharma said ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.