शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

TikTok फेम तरुणीचा प्रियकरासोबतचा तो व्हिडीओ झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 7:47 PM

नंतर या टिकटॉक फेम तरुणीने अकाऊंटवरून २ तासांत व्हिडीओ डिलीट केला होता. मात्र, त्यानंतर काही दिवसांमध्ये टिकटॉक फेम तरुणीचा प्रियकरासोबतचा तो व्हिडिओ इन्स्टाग्राम व युट्यूब या सोशल साईट्सवर व्हॉयरल झाल्याचे तिच्या चाहत्यांकडून तिला समजले.

ठळक मुद्दे तक्रारीवरून पोलिसांनी संबंधिताविरोधात आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करून या प्रकरणाच्या तपासाला पोलिसांनी सुरुवात केली आहे.शुभम श्रीवास्तव, आसिफ व शोयब खोसा यांनी या तरुणीचा प्रियकारसोबत असलेला हा व्हिडिओ युट्यूब या सोशल साईटवर व्हायरल करून आर्थिक फायदा घेण्यास सुरुवात केल्याचे या तरुणीला कळाले.

नवी मुंबई - टिकटॉक या ऍपवर प्रसिद्ध झालेल्या एका तरुणीने प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवत असताना बनविलेला व्हिडीओ तिच्याकडून अजाणतेपणी स्नॅपचॅट अकाऊंटवर पोस्ट झाला. नंतर तो व्हिडिओ काही लोकांनी इन्स्टाग्राम व युट्यूब या सोशल साईटवर अपलोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टिकटॉकवर असंख्य चाहते असलेल्या या तरुणीचा प्रियकरासोबत असलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यामुळे खारघर पोलिसांनी टिकटॉक फेम तरुणीने ८ जुलैला दिलेल्या तक्रारीवरून याबाबत गुन्हा दाखल केला आहे, तर दुसरीकडे  टिकटॉक फेम या तरुणीने प्रसिद्धीसाठी केलेला हा स्टंट असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. तक्रारीवरून पोलिसांनी संबंधिताविरोधात आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करून या प्रकरणाच्या तपासाला पोलिसांनी सुरुवात केली आहे.२२ वर्षीय टिकटॉक फेम तरुणी खारघरमध्ये राहण्यास असून ती हिंदी, पंजाबी भाषेतील चित्रपटात अभिनय, गायन आणि मॉडेलिंग करते. तसेच ती टिकटॉकवर व्हिडिओ तयार करत असल्यामुळे ती देशभरात व परदेशात टिकटॉक फेम म्हणून प्रसिद्ध आहे. तिचे टिकटॉकवर लाखो चाहतेदे खील आहेत. या तरुणीने गेल्या महिन्यात ८ जूनला दुपारी आपल्या प्रियकरासोबत स्वेच्छेने शारीरिक संबंध ठेवतानाचा व्हिडीओ बनविला होता. त्यावेळी हा व्हिडिओ चुकून तिच्याकडून तिच्या स्नॅपचॅट अकाउंटवर पोस्ट झाला होता. व्हायरल पोस्टबाबत माहिती तिच्या मैत्रिणीने तिला कळवले. तोवर व्हिडीओ १०० लोकांनी पाहून त्यापैकी ७ लोकांनी व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचे तिला समजले.नंतर या टिकटॉक फेम तरुणीने अकाऊंटवरून २ तासांत व्हिडीओ डिलीट केला होता. मात्र, त्यानंतर काही दिवसांमध्ये टिकटॉक फेम तरुणीचा प्रियकरासोबतचा तो व्हिडिओ इन्स्टाग्राम व युट्यूब या सोशल साईट्सवर व्हॉयरल झाल्याचे तिच्या चाहत्यांकडून तिला समजले. तिचा व्हिडीओ वेगवेगळ्या लिंकवर व्हायरल होऊन  त्या व्हिडिओवर अपमानास्पद, अश्लील भाषेत कमेंट्स केल्याचे आढळून आले. शुभम श्रीवास्तव, आसिफ व शोयब खोसा यांनी या तरुणीचा प्रियकारसोबत असलेला हा व्हिडिओ युट्यूब या सोशल साईटवर व्हायरल करून आर्थिक फायदा घेण्यास सुरुवात केल्याचे या तरुणीला कळाले. दरम्यान तरुणीला काही व्यक्तींनी तिचा व्हिडिओ व्हायरल करण्याची इन्स्टाग्रामवरून धमकी दिल्याचे या तरुणीने खारघर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

विकास दुबेची नेपाळ सीमेवर शोधाशोध; प्रत्येक भिंतीवर 'मोस्ट वॉन्टेड'चे पोस्टर

 

पीएमसी बँक घोटाळ्यानंतर तणावात असलेल्या महिलेने सुशांतच्या आत्महत्येनंतर संपवले आयुष्य

 

किळसवाणा प्रकार! गायीसोबत अतिप्रसंग करत होता इसम, CCTV मध्ये रेकॉर्ड झाला व्हिडीओ

 

मृत्यूचा सूड! बापरे, एका वृद्धानं महिलेचं शिर कापून पोलीस ठाण्यात घेऊन गेला अन् म्हणाला...

 

नग्न महिलेचे तुकडे तुकडे करून सुटकेस अन् मुंडकं प्लास्टिक बॅगेत ठेवलं 

 

Vikas Dubey Encounter : गुंड विकासची पत्नी म्हणते, तर त्यांना तसाच धडा शिकवेन, गरज भासल्यास बंदूकही उचलेन

टॅग्स :Tik Tok Appटिक-टॉकPoliceपोलिसNavi Mumbaiनवी मुंबईInstagramइन्स्टाग्राम