Video: छातीत झाडल्या तीन गोळ्या, मित्राच्या हत्येचा बनवला व्हिडीओ; पोलिसांची उडाली झोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 16:22 IST2025-10-03T16:20:23+5:302025-10-03T16:22:07+5:30
Meerut video viral: मेरठमधील नरहाडामध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानंतर खळबळ उडाली. त्यानंतर या तरुणाच्या हत्येचा मित्राने व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला.

Video: छातीत झाडल्या तीन गोळ्या, मित्राच्या हत्येचा बनवला व्हिडीओ; पोलिसांची उडाली झोप
Meerut Murder video: मुस्कानच्या निळ्या ड्रमच्या कांडामुळे चर्चेत आलेल्या मेरठमध्ये एका तरुणाची मित्रानेच हत्या केल्याची घटना घडली. आधी तरुणाचा मृतदेह सापडला. पण, त्याची हत्या कुणी केली, हे कळले नाही. मयत तरुणाच्या मित्रांनी हत्येचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. ज्यात एक मित्र त्याच्यावर गोळ्या झाडताना दिसत आहे.
व्हिडीओमध्ये एक तरुण खाली पडलेल्या तरुणावर गोळ्या झाडताना दिसत आहे. ११ सेंकदांच्या या व्हिडीओने मेरठच्या कायदा आणि सु्व्यवस्थेचे पितळ उघडे पाडले आहे. एखाद्या चित्रपटातील दृश्य वाटावे अशा पद्धतीने आरोपींनी हा व्हिडीओ शूट केला आहे.
#Meerut : मेरठ के थाना लिसाड़ी गेट क्षेत्र से रिहान उर्फ आदिल को कुछ लड़के किडनैप कर लोहियानगर ले जाकर वहां बेहोश किया और ट्यूबवेल पर तीन गोली मारकर कर दी।#Crime#UPPolic@meerutpolice#murder#live#shortvideo#viralpic.twitter.com/qN8NUZwVOf
— Hariom pandey (@Hariompandey1) October 3, 2025
हत्या करण्यात आलेला तरुण कोण?
एक तरुणी गोळ्या झाडताना दिसत आहे, तर दुसऱ्या तरुणाने हत्येचा सगळा व्हिडीओ शूट केला आहे. हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आदिल आहे. आदिल मेरठमधील लिसाडी गेट ठाणे परिसरात राहतो. तो कपडे विकण्याचा व्यवसाय करायचा.
एका विहिरीजवळ नेऊन त्याची हत्या करण्यात आली. आदिलची हत्या केल्यानंतर दोन्ही आरोपी मोटारसायकलवरून फरार झाले. मोटारसायकलवरून जातानाचा व्हिडीओही त्यांनी शेअर केला आहे.
मेरठ मध्ये तीन हत्या
मेरठ शहरामध्ये बुधवारी एकापाठोपाठ एक अशा तीन हत्या झाल्या. वेगवेगळ्या पोलीस ठाणे हद्दीत तीन मृतदेह मिळाले. त्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ माजली होती.
आदिलच्या कुटुंबीयांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदिलच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे.