Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 11:51 IST2025-12-21T11:50:31+5:302025-12-21T11:51:24+5:30
एका नवविवाहित जोडप्याच्या आयुष्याचा शेवट अत्यंत वेदनादायक पद्धतीने झाला आहे.

Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
लग्नानंतर नव्या आयुष्याची सुरुवात होते. आंध्र प्रदेशातील एका नवविवाहित जोडप्याच्या आयुष्याचा शेवट अत्यंत वेदनादायक पद्धतीने झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने या घटनेची भीषणता अधिकच वाढवली आहे. या व्हिडिओमध्ये पती-पत्नी ट्रेनमध्ये एकमेकांशी भांडताना दिसत आहेत आणि काही वेळातच दोघांच्या मृत्यूची बातमी समोर येते.
तेलंगणातील यादाद्री भुवनगिरी जिल्ह्यातील वंगपल्ली–आलेर रेल्वे मार्गावर १८ डिसेंबर २०२५ च्या रात्री ही धक्कादायक घटना घडली. रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील एक नवविवाहित जोडपं चालत्या ट्रेनमधून खाली पडलं, ज्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला. कोराडा सिम्हाचलम (२५) आणि त्याची पत्नी भवानी (१९) अशी मृतांची नावं आहेत. त्यांच्या लग्नाला केवळ दोन महिने झाले होते. ते सिकंदराबाद-मछलीपट्टणम एक्स्प्रेसने आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी विजयवाडा येथे जात होते.
रुळांच्या कडेला सापडले मृतदेह
पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, ट्रेन वंगपल्ली स्टेशनवरून पुढे गेल्यानंतर हे जोडपं कोचच्या दरवाजाजवळ उभं होतं. यावेळी तोल गेल्याने ते खाली पडले असावे. शुक्रवारी सकाळी रेल्वे ट्रॅकची पाहणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रुळांच्या कडेला मृतदेह दिसल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर तातडीने रेल्वे पोलिसांना पाचारण करण्यात आले. सुरुवातीला हा निव्वळ अपघात असल्याचं मानलं जात होतं.
రైలు నుంచి పడి నవ దంపతులు మృతిచెందిన ఘటనలో ట్విస్ట్
\— Telugu Scribe (@TeluguScribe) December 20, 2025
మృతికి ముందు రైలులో గొడవ పడ్డ దంపతులు
యాదాద్రి భువనగిరి జిల్లా వంగపల్లి - ఆలేరు రైలుమార్గంలో కింద పడి మృతి చెందిన దంపతులు
అయితే, ఈ ఘటనకు ముందు రైలులో గొడవ పడ్డ దంపతులు
దీంతో భర్తతో గొడవ పడి క్షణికావేశంలో ముందుగా రన్నింగ్… https://t.co/2LvgY9SzG6pic.twitter.com/fp3st5HCZp
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
या प्रकरणात मोठा ट्विस्ट तेव्हा आला, जेव्हा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला. दावा केला जात आहे की, हा व्हिडीओ घटनेच्या काही वेळ आधी ट्रेनमध्येच रेकॉर्ड करण्यात आला होता. यामध्ये पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण करताना दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता ही आत्महत्या आहे की वादातून घडलेली घटना, यावर चर्चा सुरू झाली आहे. मात्र पोलिसांनी अद्याप या व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी केलेली नाही. व्हिडीओ कधीचा आहे आणि त्यातील व्यक्ती हेच जोडपे आहे का, याचा तपास सुरू आहे.
आत्महत्या की घातपात?
सिम्हाचलम हैदराबादमधील एका केमिकल कंपनीत काम करत होता आणि पत्नीसोबत जगदगिरीगुट्टा भागात राहत होता. रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अपघात, आत्महत्या किंवा अन्य काही घातपात आहे का, या सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. पोस्टमार्टम अहवाल आणि सखोल तपासणीनंतरच या मृत्यूमागचं खरं कारण स्पष्ट होईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.