Video: The assault took place in the market; TC made suspension | Video : प्रवाशाला केलेली मारहाण पडली महागात; टीसीचे झाले निलंबन
Video : प्रवाशाला केलेली मारहाण पडली महागात; टीसीचे झाले निलंबन

ठळक मुद्देदीपक पांडुरंग राणे (५०) असं मारहाण करणाऱ्या टीसीचे नावत्याने प्रतिक शेंडगे (२३) या प्रवाशाला मारहाण केली आहे. प्रतिकच्या एका मित्राने टीसीने घातलेल्या हुज्जतीचा प्रकार मोबाईलमध्ये कैद करून सोशल मीडियावर व्हायरल केला

मुंबई - वांद्रे रेल्वे स्थानकात एका टीसीने प्रवाशाची हुज्जत घालत त्याला धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दीपक पांडुरंग राणे (५०) असं मारहाण करणाऱ्या टीसीचे नाव असून, त्याने प्रतिक शेंडगे (२३) या प्रवाशाला मारहाण केली आहे. या मारहाणीच्या घटनेनंतर पश्चिम रेल्वेने टीसी दीपक राणे याला निलंबित केले आहे.

वांद्रे रेल्वे स्थानकात टीसी दीपक राणे याने शनिवारी प्रतिकला तिकीट विचारले असता त्याने त्याच्याकडील पास दाखवला. मात्र, पासवर शिक्का नसल्याचे कारण देत प्रतीकला विनातिकीट प्रवास केल्याच्या आरोपाखाली दंड भरायला सांगितले. प्रतिकने तांत्रिक कारण असल्यामुळे दंड भरण्यास विरोध केला. यावेळी संतापलेल्या राणे यांनी त्याला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यावेळी प्रतिकच्या एका मित्राने टीसीने घातलेल्या हुज्जतीचा प्रकार मोबाईलमध्ये कैद करून सोशल मीडियावर व्हायरल केला. या गंभीर घटनेची पश्चिम रेल्वेने तात्काळ दाखल घेत दीपक राणे याचे निलंबन केले आहे.  


Web Title: Video: The assault took place in the market; TC made suspension
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.