Video : मुलुंडमध्ये वाहतूक पोलिसांना शिविगाळ; अर्वाच्च भाषा वापरणाऱ्या दुकानदाराविरोधात कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 08:21 PM2021-04-15T20:21:58+5:302021-04-15T20:24:18+5:30

Traffic police abused by Shopkeeper : वाहतूक पोलिसांनी मुलुंड पोलिसांना घटनेची माहिती देत, मदतीसाठी बोलावून घेतले.

Video: Abuse of traffic police in Mulund; Action against shopkeepers who use vulgar language | Video : मुलुंडमध्ये वाहतूक पोलिसांना शिविगाळ; अर्वाच्च भाषा वापरणाऱ्या दुकानदाराविरोधात कारवाई 

Video : मुलुंडमध्ये वाहतूक पोलिसांना शिविगाळ; अर्वाच्च भाषा वापरणाऱ्या दुकानदाराविरोधात कारवाई 

googlenewsNext
ठळक मुद्दे याप्रकरणी जतीन सतरा (३५)  या दुकानदाराला ताब्यात घेतले आहे.जतीन याचे आर आर टी रोडवर हस्तकला हे कपड्यांचे दुकान आहे.

मुंबई : मुलुंडमध्ये नो पार्किंगमध्ये दुचाकी लावणाऱ्या तरुणाला हटकल्याच्या रागात त्याने वाहतूक पोलिसाला शिविगाळ करत असभ्य वर्तन केल्याची घटना गुरूवारी घडली. याप्रकरणी जतीन सतरा (३५)  या दुकानदाराला ताब्यात घेतले आहे. वर्दी पेहनी मतलब भाई हो गये क्या ? अशी अर्वाच्च भाषा वापरून वाहतूक पोलिसांच्या अंगावर जाणाऱ्या जतीनविरोधात कारवाई करून मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे. भादंवि कलम 353,332,504,506,188,269 आणि Disaster Management Act 2005 कलम 51(b) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

जतीन याचे आर आर टी रोडवर हस्तकला हे कपड्यांचे दुकान आहे. गुरुवारी सकाळी मुलुंड वाहतूक विभागाचे पोलीस शिपाई ज्ञानेश्वर वाघ आणि गोरख सानप हे आर आर टी नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांवर कारवाई करीत होते. त्याच दरम्यान दुकानासमोर पार्क केलेल्या जतीनच्या दुुचाकीचा वाहतूक पोलीस फोटो काढत कारवाई केली. याच रागात जतीनने पोलिसांना अश्लील भाषेत शिविगाळ सुरु केली. 

   

        

वाहतूक पोलिसांनी मुलुंड पोलिसांना घटनेची माहिती देत, मदतीसाठी बोलावून घेतले. त्यानुसार मुलुंड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जतीनला ताब्यात घेत, अटकेची कारवाई केली आहे. वाहतूक पोलिसांच्या फिर्यादिवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुलुंड पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

Web Title: Video: Abuse of traffic police in Mulund; Action against shopkeepers who use vulgar language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.