सासरी येण्यास तयार नव्हती पत्नी, पतीने दाताने तोडला नाकाचा लचका आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 01:18 PM2022-09-01T13:18:22+5:302022-09-01T13:18:40+5:30

Crime News : पतीने दाताने पत्नीच्या नाकाचा लचका तोडला आणि ते तोडलेलं नाक घेऊन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. कापलेलं नाक घेऊन आरोपी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यावर एकच गोंधळ झाला.

Uttar Pradesh News : Husband bites off wife nose for not returning from parent home | सासरी येण्यास तयार नव्हती पत्नी, पतीने दाताने तोडला नाकाचा लचका आणि मग....

सासरी येण्यास तयार नव्हती पत्नी, पतीने दाताने तोडला नाकाचा लचका आणि मग....

Next

उत्तर प्रदेशात (UP Crime News) पती आणि पत्नीमध्ये भांडणांची एक अनोखी आणि धक्कादायक केस समोर आली आहे. लखीमपूर खीरीमध्ये एक महिला माहेरातून सासरी जाण्यासाठी तयार नव्हती. यावरून पती पत्नीवर इतका नाराज होता की, दोघांमध्ये खूप वाद झाला. पण त्याचा राग शांत नाही झाला आणि पतीने दाताने पत्नीच्या नाकाचा लचका तोडला आणि ते तोडलेलं नाक घेऊन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. कापलेलं नाक घेऊन आरोपी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यावर एकच गोंधळ झाला.

सासरी येण्यापासून नकार दिल्यावर आरोपी संजय कुमारने माहेरी राहत असलेली 30 वर्षीय पत्नी वंदनाचं नाक दाताने तोडलं आणि नाकाचा तुकडा घेऊन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. जखमी महिलेला लखीमपूर ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. संजय कुमारचं दुसरं लग्न साधारण दीड वर्षाआधी हैद्राबादमधील ढकिया गावातील वंदनासोबत झालं होतं. वंदना बऱ्याच दिवसांपासून आपल्या माहेरी राहत होती.

असं सांगितलं जात आहे की, संजय जेव्हा पत्नीला घेण्यासाठी तिच्या माहेरी पोहोचला तेव्हा तिने सोबत येण्यास नकार दिला. ज्यानंतर दोघांमध्ये खूप वाद झाला. त्यानंतर संतापलेल्या संजयने आपली पत्नी वंदनाचं  नाक दातांनी तोडलं. नाकाचा तोडलेला तुकडा घेऊन तो पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला.

यादरम्यान हैद्राबाद पोलिसांनी सांगितलं की, संजयच्या पहिल्या पत्नीची गावातील जमिनीच्या वाद हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आरोपीने दुसऱ्या महिलेसोबत लग्न केलं. सध्या कुणीही तक्रार देण्यासाठी आलेलं नाही. तक्रार मिळाल्यावर आरोपीवर कारवाई करण्यात येईल.

Web Title: Uttar Pradesh News : Husband bites off wife nose for not returning from parent home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.