बदल्याची आग! "माझ्यासोबत तुझी बहीण पळून..."; टोमण्यांना कंटाळला, घेतला तरुणाचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 14:41 IST2025-10-22T14:40:25+5:302025-10-22T14:41:38+5:30
एका व्यक्तीची काठ्यांनी बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली आहे.

बदल्याची आग! "माझ्यासोबत तुझी बहीण पळून..."; टोमण्यांना कंटाळला, घेतला तरुणाचा जीव
उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये एका व्यक्तीची काठ्यांनी बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली आहे. पाच वर्षांपूर्वी ओंकारने गावातील रिझवानच्या बहिणीला पळून नेलं होतं. त्यानंतर त्यावरून तो सतत टोमणे मारत होता. संतप्त झालेल्या रिझवानने आणि इतर लोकांनी त्याच्यावर हल्ला केला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी ही धक्कादायक घटना घडली. मुख्य आरोपीला अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक (एसपी) राजेश द्विवेदी यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या तरुणाची पाच वर्षांपूर्वा २८ वर्षीय ओंकारसोबत ओळख झाली, जो सप्तियारा गावचा रहिवासी आहे. तो रिझवानच्या बहिणीसोबत पळून गेला होता.
तरुणीसोबत पळून गेल्यामुळे ओंकारला जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. सुटकेनंतर ओंकार रिझवानला पाहिल्यावर सतत अपमानास्पद आणि चिथावणीखोर टिप्पणी करत असे. मंगळवारी संध्याकाळी, ओंकार शेतात जात असताना रिझवानने त्याला काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
ओंकारचा यात जागीच मृत्यू झाला. आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी रिझवान, जावीर, कादिर अली आणि समीर यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी रात्री पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.