वरात घेऊन निघत होता नवरदेव, तेव्हाच पोलिसांना घेऊन आली काकी; केला असा दावा की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 12:19 IST2023-11-29T12:19:07+5:302023-11-29T12:19:36+5:30

लग्नानंतर पिंकीला तीन मुले झाली. ज्यात दोन मुले आणि एका मुलीचा समावेश आहे. पण आता पिंकी आणि तिची पती विशेष वेगवेगळे राहतात.

UP : Groom going for wedding suddenly Aunty brought police dispute over love affair | वरात घेऊन निघत होता नवरदेव, तेव्हाच पोलिसांना घेऊन आली काकी; केला असा दावा की...

वरात घेऊन निघत होता नवरदेव, तेव्हाच पोलिसांना घेऊन आली काकी; केला असा दावा की...

यूपीच्या फिरोजाबादमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एक नवरदेव आपल्या लग्नात जाण्यासाठी तयार होता. पण अचानक तेव्हाच त्याची काकू पोलिसांना घेऊन त्याच्या घरी पोहोचली. काकीचा दावा होता की, जो तरूण नवरदेव बनला आहे त्याने तिच्यासोबत मंदिरात लग्न केलं आहे. दोघांना एक मुलगाही आहे. तो तिला सोडून दुसरं लग्न करत आहे. 

फिरोजाबादच्या नगला पसीमध्ये राहणाऱ्या विशेषचं लग्न मैनपुरी इथे राहणाऱ्या पिंकीसोबत 2010 मध्ये झालं होतं. लग्नानंतर पिंकीला तीन मुले झाली. ज्यात दोन मुले आणि एका मुलीचा समावेश आहे. पण आता पिंकी आणि तिची पती विशेष वेगवेगळे राहतात. याचं कारण म्हणजे विशेषचा पुतण्या ओमवीर. हा काकी पिंकीसोबत राहू लागला होता.

ओमवीर हा ट्रक चालवत होता. त्यामुळे येता-जाता तो पिंकीला भेटत होता. यादरम्यान दोघांमध्ये प्रेमसंबंध झाले. पिंकीनुसार, ओमवीरने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. मंदिरात लग्नही केलं. पण गेल्या काही दिवसांपासून त्याने पिंकीकडे दुर्लक्ष सुरू केलं.

गेल्या मंगळवारी रात्री ओमवीरचं लग्न एटामधील एका मुलीसोबत होणार होतं. वरात घरातून निघत होती. याची माहिती पिंकीला मिळाली. ते लगेच पोलिसांकडे आणि पोलिसांना घेऊन ओमवीरच्या घरी पोहोचली. इथे तिने गोंधळ घातला. हे सगळं बघून परिवारातील लोक हैराण झाले. कारण नात्याने पिंकी ओमवीरची काकी लागते.

पिंकीने तक्रारीत सांगितलं की, ओमवीरसोबत तिचं लग्न झालं आहे. त्यांचा एक मुलगाही आहे. पण तो आता दुसरं लग्न करत आहे. अशात पोलिसही चौकशी करत आहेत. वाद इतका वाढला होता की, दोन्हीकडील लोकांना पोलिसांनी स्टेशनमध्ये बसवलं. त्यांची चौकशी केली. आरोप आहे की, पहिल्या पतीला घटस्फोट न देता पिंकी आणि ओमवीर पती-पत्नीसारखे सोबत राहत होते. पोलिसांनी सांगितलं की, पुरावे आणि चौकशीनंतर योग्य ती कारवाई केली जाईल.

Web Title: UP : Groom going for wedding suddenly Aunty brought police dispute over love affair