दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 11:30 IST2025-06-30T11:29:35+5:302025-06-30T11:30:25+5:30

UP Crime: पोलिसांनी या गुंडावर एक लाखाचे बक्षीस जाहीर केले होते.

UP Crime: Robbery, murder...16 serious crimes in four states including Maharashtra; Encounter of notorious gangster in Uttar Pradesh | दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर

दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर

UP Crime: उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये रविवारी रात्री स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) च्या नोएडा युनिट आणि बागपत पोलिसांनी संयुक्त कारवाईत कुख्यात गुन्हेगार संदीप लोहारला ठार मारले. संदीप हा महामार्गावर ट्रक चालकांना लुटणाऱ्या कुख्यात टोळीचा म्होरक्या होता. तो हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील भाईनी महाराजगंजचा रहिवासी होता. त्याच्यावर १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

कानपूरच्या पंकी पोलिस स्टेशन परिसरात ४ कोटी रुपयांच्या निकेल प्लेट्सने भरलेल्या ट्रक लुटल्याप्रकरणी संदीप फरार होता. एसटीएफचे अतिरिक्त महासंचालक (एडीजी) अमिताभ यश यांनी सांगितले की, खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बागपतच्या कोतवाली पोलिस स्टेशन परिसरातील माविकलनजवळ घेराबंदी केली. रात्री पोलिस आणि एसटीएफच्या संयुक्त पथकाने टोळीला घेराव घालण्याचा प्रयत्न केला, तेव्हा संदीपने पोलिसांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल, पोलिसांनी गोळ्या झाडल्या, ज्यात संदीप गंभीर जखमी झाला. त्याला ताबडतोब जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

खून आणि दरोड्याच्या १६ घटना
संदीप लोहार महामार्गावरील ट्रक चालकांना लुटणाऱ्या टोळीचा म्होरक्या होता. संदीपची टोळी महामार्गावरील ट्रक चालकांसाठी भीतीचे कारण बनली होती. तो त्याच्या टोळीसह निर्जन महामार्गांवर ट्रक चालकांना मारुन मौल्यवान वस्तूंसह ट्रक लुटायचा. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, संदीपने आतापर्यंत ४ हून अधिक ट्रक चालकांची हत्या केली. त्याच्यावर उत्तर प्रदेश, हरियाणा आणि महाराष्ट्रात खून, आणि दरोड्याचे १६ हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र

 

Web Title: UP Crime: Robbery, murder...16 serious crimes in four states including Maharashtra; Encounter of notorious gangster in Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.