चांगूर बाबाचे दुबईपर्यंत नेटवर्क; महाराष्ट्र-युपीतील 1500 हिंदू तरुणींचे धर्मांतरण, चौकशीत खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 15:44 IST2025-07-10T15:43:38+5:302025-07-10T15:44:06+5:30
UP News: उत्तर प्रदेशातील चांगूर बाबा धर्मांतर प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे.

चांगूर बाबाचे दुबईपर्यंत नेटवर्क; महाराष्ट्र-युपीतील 1500 हिंदू तरुणींचे धर्मांतरण, चौकशीत खुलासा
UP News: उत्तर प्रदेशातील जमालुद्दीन उर्फ चांगूर बाबा धर्मांतर प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. बलरामपूर जिल्ह्यातील माधपूर येथील जमालुद्दीन आणि त्याची सहकारी नीतू उर्फ नसरीन यांना अलीकडेच यूपी एटीएसने अटक केली. या बाबावर देशविरोधी कारवाया आणि बेकायदेशीर धर्मांतराचे आरोप आहेत. त्याच्या अटकेनंतर चौकशीत नवनवीन खुलासे होत आहेत.
टीव्ही9हिंदीच्या वृत्तानुसार, चांगूर बाबाने 1500 हून अधिक हिंदू मुलींचे बेकायदेशीरपणे धर्मांतर केल्याचे समोर आले आहे. आता एटीएस बेकायदेशीर धर्मांतराला बळी पडलेल्यांचा पीडितांचा शोध घेत आहे. विशेष म्हणजे, चांगूर बाबाने यूपीतील बलरामपूर येथे येण्यापूर्वी महाराष्ट्रापासून ते दुबईपर्यंत आपले नेटवर्क तयार केले होते. त्याने महाराष्ट्रातही मोठ्या संख्येने धर्मांतर केल्याचे समोर आले आहे.
चांगूर बाबा मुंबईत अंगठ्या विकायचा
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चांगूर बाबा मुंबईतील एका दर्ग्याबाहेर अंगठ्या विकायचा. काही वेळातच तो आखाती देशांतील अशा संस्थांच्या संपर्कात आला, ज्या हिंदूंचे इस्लाम धर्मात धर्मांततर करायच्या. बलरामपूरमध्ये आल्यानंतर त्याने येथे आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये बेकायदेशीरपणे लोकांचे धर्मांतर करण्यास सुरुवात केली. त्याचे जवळचे नातेवाईक आणि अनुयायी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करायचे.
धर्मांतरासाठी प्रलोभने द्यायचा
आझमगडमध्ये बेकायदेशीरपणे लोकांचे धर्मांतर केल्याबद्दल बाबाच्या अनेक नातेवाईकांवर दोन वर्षांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. एसटीएफच्या तपास अहवालानुसार, बलरामपूर आणि त्याच्या आसपासच्या जिल्ह्यांमधील काही पोलिस-प्रशासन, एलआययू अधिकाऱ्यांनी पैशासाठी बाबाला मदत केली होती. बाबा बलरामपूर आणि त्याच्या आसपासच्या जिल्ह्यांची लोकसंख्या बदलू इच्छित होता. बाबा गैर-मुस्लिमांना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी सर्व प्रकारे प्रलोभन देत असे.
न्यायालयाने बुधवारी चांगूर बाबा आणि त्याची जवळची सहकारी नीतू रोहरा उर्फ नसरीन यांना एटीएसकडे सात दिवसांची कोठडी सुनावली आहे. दोघांचाही रिमांड कालावधी आजपासून, म्हणजेच गुरुवारपासून सुरू होईल. या काळात आयबी आणि एनआयएचे अधिकारी चांगूर बाबाची चौकशी करतील.