उन्नाव बलात्कार प्रकरण : ७ दिवसात चौकशी आणि ४५ दिवसात निर्णय; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 16:58 IST2019-08-01T16:56:10+5:302019-08-01T16:58:04+5:30

च याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अनेक निर्णय घेतले आहेत. 

Unnao rape case: Inquiry within 7 days, decision in 45 days; Order of the Supreme Court | उन्नाव बलात्कार प्रकरण : ७ दिवसात चौकशी आणि ४५ दिवसात निर्णय; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

उन्नाव बलात्कार प्रकरण : ७ दिवसात चौकशी आणि ४५ दिवसात निर्णय; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

ठळक मुद्देमुख्य न्या. रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने उन्नाव बलात्काराचा खटला ४५ दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. पीडित तरुणीच्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफची सुरक्षा देण्यात यावी

नवी दिल्ली - उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणीसर्वोच्च न्यायालयाने आज तीन वेळा सुनावणी पार पडली. मुख्य न्या. रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने उन्नाव बलात्काराचा खटला ४५ दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अनेक निर्णय घेतले आहेत. 

उन्नाव प्रकरणाशी जोडलेल्या सर्व पाच केसेस लखनऊ येथून दिल्लीत चालविण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच पीडित तरुणीच्या अपघाताची ७ दिवसांत चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला देण्यात आले आहेत. पीडित तरुणीच्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफची सुरक्षा देण्यात यावी आणि त्यासोबतच वकिलाला देखील सुरक्षा देण्यात यावी. उत्तर प्रदेश सरकारला पीडित तरुणीला २५ लाख येत्या शुक्रवारपर्यंत देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. पीडित तरुणीवर लखनऊ येथे योग्य उपचार होत नसल्यास एम्स रुग्णालयात तिच्या कुटुंबियांच्या सहमतीने हलविण्याचे देखील न्यायालयाने आदेश दिले आहेत. या खटल्याशी संबंधित सुनावणी ४५ दिवसांत पूर्ण केली जावी आणि मुख्य न्या. गोगोई यांनी जर पीडित तरुणीच्या काकाला दुसऱ्या तुरुंगात पाठवायचे असल्यास याबाबत अहवाल सादर करावा असे सांगितले. 

 

Web Title: Unnao rape case: Inquiry within 7 days, decision in 45 days; Order of the Supreme Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.