शस्त्राचा धाक दाखवून डिलिव्हरी बॉयला लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 19:15 IST2019-06-11T19:10:59+5:302019-06-11T19:15:53+5:30

धारधार हत्याराचा धाक दाखवून व लाथाबुक्यांनी मारहाण करत चौघांनी मिळून एका डिलिव्हरी बॉयला लुटले...

unknown person theft showing weapon to Delivery boy | शस्त्राचा धाक दाखवून डिलिव्हरी बॉयला लुटले

शस्त्राचा धाक दाखवून डिलिव्हरी बॉयला लुटले

पिपंरी : धारधार हत्याराचा धाक दाखवून व लाथाबुक्यांनी मारहाण करत चौघांनी मिळून एका डिलिव्हरी बॉयला लुटले. ही घटना रविवारी (दि. ९ ) रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास वाकड येथील सयाजी हॉटेल समोर घडली. प्रदीप तुकाराम कांबळे (वय- २७ रा. पुनावळे) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
  अज्ञात चार चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रदीप हे एका खासगी कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉयचे काम करत आहेत. ते रविवारी रात्री नेहमीप्रमाणे डिलिव्हरी घेवून जात असताना वाकड येथील हॉटेल सयाजीसमोर दोन दुचाकीवरुन आलेल्या चार आरोपींनी त्यांना अडवले व धारदार हत्याराचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील १८ हजार ५०० रुपये रोख व १३ हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा ३१ हजार ५०० रुपयांचा ऐवज जबरदस्ती काढून घेतला व लाथा बुक्क्याने मारहाण करुन निघून गेले. याप्रकरणी वाकड पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Web Title: unknown person theft showing weapon to Delivery boy