४ महिन्याच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू; महिलेसह चिमुकलीला लाठी काठीने मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 21:23 IST2021-03-11T21:22:58+5:302021-03-11T21:23:44+5:30

Crime News : मुलीची आई गंभीर जखमी झाली आहे. सध्या पोलीस ताब्यात असलेल्या आरोपींची चौकशी करत आहेत.

Unfortunate death of 4 year old girl; 'kid and mother were beaten with a stick | ४ महिन्याच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू; महिलेसह चिमुकलीला लाठी काठीने मारहाण 

४ महिन्याच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू; महिलेसह चिमुकलीला लाठी काठीने मारहाण 

ठळक मुद्देसुनील कुशवाह नावाच्या व्यक्तीचा गावातीलच रिझवानशी जुना वाद होता, अशी माहिती मिळाली आहे.

प्रयागराजः उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधून एक धक्कादायकी घटना समोर येत आहे, ती वाचून तुम्हाला धक्का बसेल. येथील सराय इनायत परिसरात सूड घेण्यासाठी त्याच्या चार महिन्यांच्या मुलीला लाठीने मारहाण केली. त्याचवेळी मुलीची आई गंभीर जखमी झाली आहे. सध्या पोलीस ताब्यात असलेल्या आरोपींची चौकशी करत आहेत.


सुनीलने साक्ष देण्यास नकार दिला

बुधवारी सायंकाळी सराय इनायत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमरसपूर गावात काही गुंडांनी घरात घुसून महिला आणि तिच्या चार महिन्यांच्या चिमुकल्या मुलीवर लाठी-काठीने हल्ला केला. या हल्ल्यात मुलीचा जागीच मृत्यू झाला. सुनील कुशवाह नावाच्या व्यक्तीचा गावातीलच रिझवानशी जुना वाद होता, अशी माहिती मिळाली आहे. एका प्रकरणात आरोपी रिझवान सुनील कुशवाहावर साक्ष देण्यासाठी दबाव आणत होता, परंतु सुनील त्याच्या बाजूने वक्तव्य करण्यास तयार नव्हता.


सुनील घरी नव्हता, त्यानंतर पत्नी व मुलीने हल्ला केला

यामुळे १० मार्च रोजी संध्याकाळी सुनीलच्या घरावर हल्ला केला. त्यावेळी सुनील हजर नव्हता तेव्हा त्याने पत्नी व मुलीवर लाठी काठीने हल्ला करुन मुलीची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि चिमुकलीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविला. त्याचवेळी जखमी पत्नीला स्वरूप राणी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.


७ जणांवर गुन्हा दाखल

मीडिया रिपोर्टनुसार इन्स्पेक्टर संजय कुमार द्विवेदी यांनी माहिती दिली आहे की, रिजवान व्यतिरिक्त पत्नी सबिया फातिमा, मुलगी बुशरा फातिमा, नशरा फातिमा, जोया फातिमा, मुलगा अली आणि मेहुणातारिक सय्यद यांच्याविरूद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील कारवाई करत आहेत.

Web Title: Unfortunate death of 4 year old girl; 'kid and mother were beaten with a stick