शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
2
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
3
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
4
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
5
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
6
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
7
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
8
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
9
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
10
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
11
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
12
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
13
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
14
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
16
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
17
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
18
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
19
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
20
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...

केरळ सोनं तस्करीप्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद आणि डी कंपनीचा हात असण्याची NIA ला शक्यता 

By पूनम अपराज | Published: October 15, 2020 2:19 PM

Gold Smuggling : NIA ने म्हटले आहे की, आरोपीने या प्रकरणात अनेक वेळा टांझानियाला भेट दिली आहे.

ठळक मुद्देटांझानियात सोन्याच्या खाणीसाठी परवाना मिळवण्याचा प्रयत्न केला असल्याचेही त्यांनी एनआयएला सांगितले. त्याने टांझानियामध्ये सोने खरेदी केले आणि ते यूएईला विकले याची कबुलीही त्याने दिली.दुसरीकडे, केरळ सोन्याच्या तस्करी प्रकरणाचा तपास करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक टाळण्यासाठी, राज्याचे मुख्यमंत्र्यांचे माजी प्रधान सचिव एम. शिवशंकर यांनी बुधवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि अटकपूर्व जामिनासाठी विनंती केली आहे.

कोची - केरळ सोन्याच्या तस्करी प्रकरणातील दहशतवादी कनेक्शनची चौकशी करणार्‍या राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) म्हटले आहे की, या प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याची डी कंपनीचा हात असल्याचा संशय वर्तवण्यात येत आहे. NIA ने म्हटले आहे की,सोन्याच्या तस्करीतून मिळणारा नफा देशविरोधी विघातक कार्यांशी संबंधित असलेल्या गुप्तचर आणि दहशतवादी कारवायांच्या संभाव्यतेसाठी वापरला जातो.या प्रकरणातील चौकशीसाठी सर्व आरोपींना १० दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे एनआयएने म्हटले आहे. NIAने सर्व आरोपींच्या जामीन अर्जाला विरोध केला. NIA ने म्हटले आहे की, आरोपीने या प्रकरणात अनेक वेळा टांझानियाला भेट दिली आहे.केरळ सोन्याच्या तस्करी प्रकरणातील आरोपी रमीस याने ताबडतोब चौकशी केली असता त्याने टांझानियात अनेक वेळा हिरा व्यवसाय करण्याचा प्रयत्न केल्याचे एनआयएकडून माहिती देण्यात आली आहे. टांझानियात सोन्याच्या खाणीसाठी परवाना मिळवण्याचा प्रयत्न केला असल्याचेही त्यांनी एनआयएला सांगितले. त्याने टांझानियामध्ये सोने खरेदी केले आणि ते यूएईला विकले याची कबुलीही त्याने दिली.

केरळ सोन्याच्या तस्करी प्रकरणातील आरोपी रमीस याने ताबडतोब चौकशी केली असता त्याने टांझानियात अनेक वेळा हिरा व्यवसाय करण्याचा प्रयत्न केल्याचे एनआयएकडून माहिती देण्यात आली आहे. टांझानियात सोन्याच्या खाणीसाठी परवाना मिळवण्याचा प्रयत्न केला असल्याचेही त्यांनी एनआयएला सांगितले. त्याने टांझानियामध्ये सोने खरेदी केले आणि ते यूएईला विकले याची कबुलीही त्याने दिली.दुसरीकडे, केरळ सोन्याच्या तस्करी प्रकरणाचा तपास करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक टाळण्यासाठी, राज्याचे मुख्यमंत्र्यांचे माजी प्रधान सचिव एम. शिवशंकर यांनी बुधवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि अटकपूर्व जामिनासाठी विनंती केली आहे. शिवशंकर यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, जबाबदार सरकारी नोकर म्हणून त्यांनी गुन्ह्याच्या तपासामध्ये जास्तीत जास्त सहकार्य केले आहे. ते म्हणाले की. ईडीने कित्येकदा त्याला समन्स बजावले होते. शिवशंकर म्हणाले की, गेल्या एका महिन्यात ९० तासांहून अधिक वेगवेगळ्या एजन्सीद्वारे त्यांच्यावर चौकशी केली जात आहे, परंतु कोणत्याही (तपास यंत्रणेने) त्यांच्याविरूद्ध अहवाल न्यायालयात सादर केलेला नाही. मीडिया ट्रायलमुळे तपास यंत्रणेवर अत्यधिक दबाव होता, अशी मला भीती असल्याचे त्यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे. 

टॅग्स :Dawood Ibrahimदाऊद इब्राहिमGoldसोनंSmugglingतस्करीKeralaकेरळArrestअटकEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय