शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेंडला भेटायला निघाला अन्... टिटवाळ्यात सापडलेल्या 'त्या' कारचं गुपित फुटलं; हत्येप्रकरणी विद्यार्थ्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 18:39 IST

कल्याणमध्ये उबर चालकाच्या हत्येच्या प्रकरणाचा अखेर उलघडा झाला आहे.

Kalyan Crime: एका २१ वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने स्वतःच्या प्रेयसीला भेटण्यासाठी जुन्नरला जाण्याचा बेत आखला, पण या प्रवासाचा अंत एका निष्पाप टॅक्सी चालकाच्या खुनाने होईल, असे कोणालाही वाटले नव्हते. टिटवाळा ते जुन्नर या प्रवासादरम्यान माळशेज घाटात झालेल्या वादातून उबेर चालकाची गळा चिरून हत्या करण्यात आली. याप्रकरणी ओतूर पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याला बेड्या ठोकल्या आहेत.

टिटवाळा येथील रहिवासी असलेल्या आदर्श चंद्रकांत भालेराव (वय २१) याने ५ मार्च २०२६ रोजी दुपारी ३ च्या सुमारास आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी जुन्नरला जाण्यासाठी उबेर बुक केली होती. नासीर अहम्मद अन्सारी हा आपली कार घेऊन प्रवाशाला घेण्यासाठी पोहोचला. मात्र, माळशेज घाटातील सितेवाडी हद्दीत गणेशखिंड येथे लघुशंकेसाठी गाडी थांबवली असता, चालक आणि प्रवासी यांच्यात पैशांवरून जोरदार वाद झाला.

स्वसंरक्षणाचा बनाव की घातपात?

आरोपी आदर्शने पोलिसांना दिलेल्या कबुलीनुसार, चालकानेच त्याला चाकू दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला होता. स्वसंरक्षणार्थ झटापट करत असताना आरोपीने चालकाच्या हातातील चाकू हिसकावून त्याच्या मानेवर सपासप वार केले, ज्यात नासीर यांचा जागीच मृत्यू झाला. नासीर यांचा मृतदेह घाटातील कठड्यावरून खाली फेकून दिल्यानंतर आरोपीने रक्ताने माखलेली तीच कार पुन्हा टिटवाळ्याच्या दिशेने पळवली.

रक्ताने माखलेल्या कारमुळे फुटले गुपित

नासीर अन्सारी बेपत्ता झाल्याने त्यांच्या भावाने ओतूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. दरम्यान, ७ मार्च रोजी पोलिसांना गणेशखिंड घाटात एक मृतदेह सापडला. दुसरीकडे, कल्याण-मुरबाड महामार्गावरील गोवेली गावाजवळ रक्ताने माखलेली इर्टिगा कार बेवारस अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या कारचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली.

तांत्रिक तपासाने आरोपी गजाआड

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल आणि त्यांच्या पथकाने उबेर कंपनीकडून मिळालेली माहिती, कारचे जीपीएस लोकेशन आणि सीसीटीव्ही फटेज तपासले. एका पेट्रोल पंपावरील फुटेजमध्ये आरोपी कारमध्ये इंधन भरताना कैद झाला होता. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने आदर्श भालेराव याला टिटवाळा येथून ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपीला १२ मार्च २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Love-trip turns deadly: Student arrested for Uber driver's murder.

Web Summary : An engineering student, planning to meet his girlfriend, murdered an Uber driver during a dispute in Malshej Ghat. The student, after abandoning the blood-stained car, was arrested based on technical evidence. Police investigation continues.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkalyanकल्याणPoliceपोलिस