अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यावर हल्ला करणाऱ्या दोघांना अटक, 'जलसा'बाहेर घडली होती घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 06:31 PM2020-07-18T18:31:32+5:302020-07-18T18:38:26+5:30

अंधेरी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेत हा गुन्हा पुढील तपासासाठी त्यांनी जुहू पोलिसांकडे वर्ग केला आणि दोघांना अटक करण्यात आली.

The two who attacked Amitabh Bachchan's fans were arrested, the incident took place outside 'Jalsa' | अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यावर हल्ला करणाऱ्या दोघांना अटक, 'जलसा'बाहेर घडली होती घटना

अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यावर हल्ला करणाऱ्या दोघांना अटक, 'जलसा'बाहेर घडली होती घटना

Next
ठळक मुद्देभाईंदर येथे राहणाऱ्या संजय गोपी खारवा उर्फ राजेंद्र उर्फ खिडकी आणि माटुंगा लेबर कॅम्पमध्ये राहणाऱ्या सुरेश कानजी खारवा यांना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणातील तक्रारदार अकील रफिक अहमद (३५) हा मूळचा उत्तरप्रदेशच्या बरेलीतील ताईपुरी पोलिस चौकी परिसरात राहणारा आहे.

मुंबई - सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना पाहण्यासाठी उत्तर प्रदेशातून मुंबईत आलेल्या तरुणावर तीन मद्यपींनी हल्ला केल्याचा प्रकार घडला काही दिवसांपूर्वी घडला होता. दारू पिण्याच्या वादातून हा हल्ला झाल्याचा दावा तक्रारदार करत आहे. दरम्यान, या प्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून  पुढील तपासासाठी हा गुन्हा जुहू पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर आता जुहू पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. भाईंदर येथे राहणाऱ्या संजय गोपी खारवा उर्फ राजेंद्र उर्फ खिडकी आणि माटुंगा लेबर कॅम्पमध्ये राहणाऱ्या सुरेश कानजी खारवा यांना बेड्या ठोकल्या आहेत. 


या प्रकरणातील तक्रारदार अकील रफिक अहमद (३५) हा मूळचा उत्तरप्रदेशच्या बरेलीतील ताईपुरी पोलिस चौकी परिसरात राहणारा आहे. तो प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन, अक्षय कुमार या अभिनेत्यांचा मोठा चाहता असल्याचा दावा करत आहेत. ३० जून रोजी घरातल्यांना न सांगताच तो मुंबईला आला होता. त्या दिवसांपासून तो दररोज अमिताभ यांच्या बंगल्याबाहेर झोपत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. दरम्यान ४ जुलैच्या मध्यरात्री अकील हा भारती आरोग्य निधी रुग्णालयाच्या फुटपाथवर झोपला होता. त्यावेळी त्या ठिकाणी आरोपी आले. अकीलला एकटे पाहून त्यांनी त्याला जबरदस्ती दारू पिण्यासाठी चल असा आग्रह केला. याला अकिल याने विरोध केल्याने अकिल आणि आरोपींमध्ये शाब्दीक वाद झाला. त्यावरून तीनही आरोपींनी अकीलवर चाकूने हल्ला केला. या हल्यात अकिलच्या पोटावर, छातीवर आणि उजव्या हाताच्या दंडावर हल्ला केल्याने तो त्यात जखमी झाला असून त्याच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अंधेरी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अंधेरी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेत हा गुन्हा पुढील तपासासाठी त्यांनी जुहू पोलिसांकडे वर्ग केला आणि दोघांना अटक करण्यात आली. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

९० वर्षीय नवऱ्याला रॉकेल टाकून पेटवले अन् स्वत:ही जीव सोडला; कारण ऐकून धक्का बसेल

 

गुंतवणूकीवर दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून तिघांना लाखोंचा गंडा

 

अखेर पाक सरकार झुकलं; कुलभूषण जाधव यांना भारतीय दूतावासातील २ अधिकारी भेटणार

 

...अन् 'बेबी पेंग्विन' हॅशटॅग ट्रेंड झाला!; जाणून घ्या आदित्य ठाकरेचं काय आहे 'कनेक्शन'

 

मदरशामध्ये शिक्षकाने चार वर्षे केला विद्यार्थिनीवर बलात्कार; आता गुन्हा दाखल झाला

 

पनवेलच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये २५ वर्षीय तरुणीचं लैंगिक शौषण, विकृत प्रकार आला समोर

 

स्वतःचेच चित्र रेखाटून मृत्यू दिनांक लिहून शिक्षकाने केली आत्महत्त्या

 

बाप की हैवान! पोटच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या पित्यास १० वर्षांचा कारावास

Web Title: The two who attacked Amitabh Bachchan's fans were arrested, the incident took place outside 'Jalsa'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.