...अन् 'बेबी पेंग्विन' हॅशटॅग ट्रेंड झाला!; जाणून घ्या आदित्य ठाकरेचं काय आहे 'कनेक्शन'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 07:48 PM2020-07-16T19:48:04+5:302020-07-16T19:56:43+5:30

ट्विटर यूजर समीत ठक्कर यांनी वापरलेल्या “पेंग्विन बेटा” आणि “बेबी पेंग्विन” या शब्दांद्वारे शिवसेनेच्या वंशजांवर एकप्रकारे टोला लगावला आहे.

... and 'Baby Penguin' hashtag trend !; Find out what Aditya Thackeray's 'connection' is. | ...अन् 'बेबी पेंग्विन' हॅशटॅग ट्रेंड झाला!; जाणून घ्या आदित्य ठाकरेचं काय आहे 'कनेक्शन'

...अन् 'बेबी पेंग्विन' हॅशटॅग ट्रेंड झाला!; जाणून घ्या आदित्य ठाकरेचं काय आहे 'कनेक्शन'

googlenewsNext
ठळक मुद्दे13 जुलैपर्यंत शिवसेनेच्या कायदेशीर सल्लागाराने व्ही.पी. रोड पोलीस ठाण्यात ठक्करच्या विरोधात तक्रार दाखल केली नव्हती. धर्मेंद्र मिश्रा यांच्या तक्रारीनंतर व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात बदनामीचा, माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून समीर ठक्करला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर अश्लील ट्वीट पोस्ट केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी नागपूरच्या एका व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ट्विटर यूजर समीत ठक्कर यांनी वापरलेल्या “पेंग्विन बेटा” आणि “बेबी पेंग्विन” या शब्दांद्वारे शिवसेनेच्या वंशजांवर एकप्रकारे टोला लगावला आहे.  नंतरचे सोशल मीडियावर या हॅशटॅगचा ट्रेंड झाला. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार जून आणि जुलैमध्ये (1 जून, 30 जून आणि 1 जुलै) तीन दिवसांत आक्षेपार्ह ट्विट पोस्ट करण्यात आली होते, परंतु 13 जुलैपर्यंत शिवसेनेच्या कायदेशीर सल्लागाराने व्ही.पी. रोड पोलीस ठाण्यात ठक्करच्या विरोधात तक्रार दाखल केली नव्हती. उद्धव ठाकरे यांना मुगल शासक ‘औरंगजेब’ म्हणून ठक्कर यांने संबोधित केले आहे. तर ठक्कर याने आदित्य ठाकरेंचा उल्लेख मुहम्मद आजम शहा असा केला आहे, ‘मोहम्मद आजम शहा’ जो औरंगजेबचा मुलगा आहे. यावर धर्मेंद्र मिश्रा यांनी आक्षेप घेतला आहे. धर्मेंद्र मिश्रा यांच्या तक्रारीनंतर व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात बदनामीचा, माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून समीर ठक्करला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.



ठक्कर याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम २९२, ५०० आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदुस्थान टाईम्सच्या अहवालानुसार आणखी एका महिलेनेही पोलिसांकडे अश्लील पोस्ट असल्याची तक्रार केली होती.ठक्कर (@thakkar_sameet) चे ट्विटरवर जवळजवळ ४४००० फॉलोअर्स आहेत. त्यापैकी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही आहेत.व्ही पी रोड पोलिसांनी संपर्क साधून लॉकडाऊन संपल्यानंतर पोलीस स्टेशनला येऊ शकतो असं कळवलं आहे आणि पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त यांना ईमेल करुन जबाब पाठवला असल्याची माहिती समीत ठक्करने दिली आहे.


 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

लॉकडाऊनमध्ये नोकरीच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार; पीडितेला घरात डांबून ठेवलं

 

निंदनीय प्रकार भोवला! मनसेच्या अविनाश जाधव यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल 

 

ताई मला वाचव!  हबीब मला मारून टाकेल; रिदाने मृत्यूपूर्वी केला होता व्हिडिओ कॉल, म्हणाली होती...

 

हत्येनंतर चोराने बलात्कार केला; विवस्त्र मृतदेहाला फ्रिजमध्ये ठेवायचा प्रयत्न फसला

 

९० वर्षीय नवऱ्याला रॉकेल टाकून पेटवले अन् स्वत:ही जीव सोडला; कारण ऐकून धक्का बसेल

 

गुंतवणूकीवर दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून तिघांना लाखोंचा गंडा

 

अखेर पाक सरकार झुकलं; कुलभूषण जाधव यांना भारतीय दूतावासातील २ अधिकारी भेटणार

Web Title: ... and 'Baby Penguin' hashtag trend !; Find out what Aditya Thackeray's 'connection' is.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.