90-year-old husband threw kerosene and set himself on fire; shocking when hear reason | ९० वर्षीय नवऱ्याला रॉकेल टाकून पेटवले अन् स्वत:ही जीव सोडला; कारण ऐकून धक्का बसेल

९० वर्षीय नवऱ्याला रॉकेल टाकून पेटवले अन् स्वत:ही जीव सोडला; कारण ऐकून धक्का बसेल

ठळक मुद्दे पतीचे नाव लक्ष्मण पाटील आणि पत्नीचं नाव पार्वती पाटील असं आहे.लक्ष्मण पाटील आणि पार्वती पाटील हे वृद्ध दाम्पत्य एका जुन्या घरात राहत होते. लक्ष्मण पाटील हे गेल्या काही वर्षांपासून आजाराशी लढत होते.

कोल्हापूर - वृद्ध पतीला पेटवून पत्नीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. आजारपणाला कंटाळून वृद्ध महिलेने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. चंदगड तालुक्यातील कडलगे गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पतीचे नाव लक्ष्मण पाटील आणि पत्नीचं नाव पार्वती पाटील असं आहे.

लक्ष्मण पाटील आणि पार्वती पाटील हे वृद्ध दाम्पत्य एका जुन्या घरात राहत होते. लक्ष्मण पाटील हे गेल्या काही वर्षांपासून आजाराशी लढत होते. पत्नी पार्वती ही त्यांची जोपासना करत होती. मात्र. अखेर लक्ष्मण पाटील यांच्या आजारपणाला कंटाळून त्यांच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवले आणि त्यानंतर स्वतः ला पेटवून घेऊन पार्वती यांनी आत्महत्या केली. लक्ष्मण पाटील यांना पहिल्या पत्नीपासून एक आणि दुसरी पत्नी पार्वती यांच्यापासून एक अशी दोन मुले आहेत. ती दोन्ही मुले वेगवेगळ्या घरात राहतात. मृत वृद्ध दाम्पत्य जुन्या घरात वास्त्यव्यास होते. सकाळी सहा वाजता मुलगा पुंडलिक आई-वडिलांकडे आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. मुलाने दिलेल्या माहितीनंतर मृत पार्वती पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, वृद्ध दाम्पत्याचा जळून शेवट झाल्यामुले चंदगड तालुक्यात शोक व्यक्त करण्यात येत आहे, अशी माहिती आयबीएन लोकमत यांनी दिली आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

एमबीएचा विद्यार्थी निघाला गुन्हेगार, दोघांना ३ पिस्तुलांसह अटक 

 

वादग्रस्त साहिलची ऑडिओ क्लिप व्हायरल, पोलिसांकडून जागोजागी छापेमारी

 

बनावट प्रोफाईल तयार करून मार्केटिंग करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश

 

माझी संपत्ती विकून देणं देऊन टाका; आम्हा सर्वांचे अवयव दान करा !

 

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या पप्पू यादव यांना अमित शाहांनी दिलं असं उत्तर

 

निंदनीय प्रकार भोवला! मनसेच्या अविनाश जाधव यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल 

Web Title: 90-year-old husband threw kerosene and set himself on fire; shocking when hear reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.