सुशांत सिंग राजपुतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी? खुद्द अमित शहांनी पाठविले पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 04:31 PM2020-07-15T16:31:37+5:302020-07-15T17:19:43+5:30

सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशीची विनंती मान्य करत गृहमंत्री अमित शहा यांनी जन अधिकार पार्टीचे पप्पू यादव यांना पत्र पाठविले आहे.

Amit Shah responds to Pappu Yadav's demand for CBI probe into Sushant Singh Rajput's murder | सुशांत सिंग राजपुतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी? खुद्द अमित शहांनी पाठविले पत्र

सुशांत सिंग राजपुतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी? खुद्द अमित शहांनी पाठविले पत्र

Next
ठळक मुद्दे अमित शहा यांच्या कार्यालयातून मिळालेल्या पत्राची एक प्रत यादव यांनी आपल्या अधिकृत ट्विटर पेजवर शेअर केली. यादव यांनी आपल्या ट्विटमध्ये शहा यांना सुशांतप्रकरणी त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले.

सुशांत सिंग राजपूत याने महिनाभरापूर्वी १४ जून रोजी आत्महत्या केली होती. मात्र, त्याच्या चाहत्यांना सुशांतच्या आत्महत्येची बातमी खरी वाटत होती. ३४ वर्षीय अभिनेत्याच्या अकाली निधनाने बॉलिवूड इंडस्ट्रीत नेपोटिझम, आवडती व्यक्तीला दिले जाणारे प्रोत्साहन यावर चर्चा सुरू झाली, तर अनेक राजकीय व्यक्तींसह अनेकांनी त्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी अशी विनंती केली. अभिनेत्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे का? यांची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी अनेकांनी केली. सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशीची विनंती मान्य करत गृहमंत्री अमित शहा यांनी जन अधिकार पार्टीचे पप्पू यादव यांना पत्र पाठविले आहे.

अमित शहा यांच्या कार्यालयातून मिळालेल्या पत्राची एक प्रत यादव यांनी आपल्या अधिकृत ट्विटर पेजवर शेअर केली. यादव यांनी १६ जून २०२० रोजी विनंती केली होती, जिथे सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. सीबीआय एमएचएअंतर्गत (मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स) आणि ते डीओपीटी  (Department of Personnel and Training) च्या अधिपत्याखाली येत नसल्यामुळे ते संबंधित मंत्रालयाकडे पाठवत असल्याचे अमित शाह यांनी पत्रात म्हटले आहे.


यादव यांनी आपल्या ट्विटमध्ये शहा यांना सुशांतप्रकरणी त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले. त्यांनी ट्वीटमध्ये  "अमित शाह जी आप चाहें तो एक मिनट में सुशांत मामले की CBI जांच हो सकती है। इसे टालें नहीं! बिहार के गौरव फ़िल्म अभिनेता सुशांत सिंह राजपूत जी की संदिग्ध मृत्यु की CBI जांच के लिए केंद्रीय गृह मंत्री जी को पत्र लिख आग्रह किया था। उन्होंने कार्रवाई के लिए पत्र अग्रसारित कर दिया है। असे नमूद केले आहे. (अमित शाह जी, तुमच्या मनात असेल तर एका मिनिटात सुशांत प्रकरणात सीबीआय चौकशी होऊ शकते. ते टाळू नका!) अशी विनंती करणारे पात्र केंद्रीय गृहमंत्र्यांना पाठविण्यात आले. बिहारचा अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या संशयास्पद मृत्यूबद्दल सीबीआय चौकशीसाठी शहा यांनी संबंधित मंत्रालयाला कारवाईसाठी पत्र पाठवले आहे.

यापूर्वी सुब्रमण्यम स्वामी यांनीही सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यांनी याबाबत ट्विटरवर ट्विट केले होते. दरम्यान, सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूचा मुंबई पोलिस तपास करत आहेत. या प्रकरणात एकूण ३० पेक्षा जास्त जणांनी जबाब नोंदवले असून त्यात त्यांचे कुटुंब, मैत्रीण रिया चक्रवर्ती, दिल बेचारचा दिग्दर्शक मुकेश छाब्रा, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, ज्यांच्यासोबत काम करायचे होते तेही होते. सुशांतच्या अनेक व्यावसायिक आणि वैयक्तिक संपर्कांना समजून घेण्यासाठी प्रश्न विचारले जात आहे, तसेच  फिल्म इंडस्ट्रीत अस्तित्त्वात असलेल्या व्यावसायिक स्पर्धेमुळे अभिनेता स्वतःचा जीव घेण्यास भाव पडले का? याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. 

 

 

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

एमबीएचा विद्यार्थी निघाला गुन्हेगार, दोघांना ३ पिस्तुलांसह अटक 

 

वादग्रस्त साहिलची ऑडिओ क्लिप व्हायरल, पोलिसांकडून जागोजागी छापेमारी

 

बनावट प्रोफाईल तयार करून मार्केटिंग करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश

 

माझी संपत्ती विकून देणं देऊन टाका; आम्हा सर्वांचे अवयव दान करा !

Web Title: Amit Shah responds to Pappu Yadav's demand for CBI probe into Sushant Singh Rajput's murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.