स्वतःचेच चित्र रेखाटून मृत्यू दिनांक लिहून शिक्षकाने केली आत्महत्त्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 07:03 PM2020-07-17T19:03:54+5:302020-07-17T19:08:18+5:30

काही दिवसापासून आपली पत्नी माहेरी निघून गेल्याने गंगाराम विचलित अवस्थेत होते.गंगाराम हा चित्रकलेत पारंगत आणि वारली चित्रकार होता.

The teacher committed suicide by writing the date of death from his own picture line | स्वतःचेच चित्र रेखाटून मृत्यू दिनांक लिहून शिक्षकाने केली आत्महत्त्या

स्वतःचेच चित्र रेखाटून मृत्यू दिनांक लिहून शिक्षकाने केली आत्महत्त्या

Next
ठळक मुद्दे८ जून २०२०रोजी गंगारामने आपले स्वतःचे चित्र  रेखाटले . त्या चित्रावर दि- १५-७-२०२० बुधवार  मृत्यू दिनांक टाकली. गंगाराम चौधरी हे चळणी येथील शाळेत  चित्रकला शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांचे लग्न 2016 साली झाले होते.

कासा  - डहाणू तालुक्यातील निंबापूर (महालपाडा ) येथील ३१ वर्षाचे तरुण चित्रकला शिक्षक  गंगाराम रमेश चौधरी यांनी आपलं स्वतःचे चित्र रेखाटून त्यावर मृत्यू दिनांक लिहून आपल्या फोटोला हार घालून गळफास घेऊन घरातच आत्महत्त्या केल्याची मन हेलवणारी धक्कादायक घटना घडली आहे.
        

काही दिवसापासून आपली पत्नी माहेरी निघून गेल्याने गंगाराम विचलित अवस्थेत होते.गंगाराम हा चित्रकलेत पारंगत आणि वारली चित्रकार होता. ८ जून २०२०रोजी गंगारामने आपले स्वतःचे चित्र  रेखाटले . त्या चित्रावर दि- १५-७-२०२० बुधवार  मृत्यू दिनांक टाकली. आणि चित्राला हार घालून त्याचा फोटो काढून त्यांच्या एक आप्तेष्टाला व्हॉटस ऍप्सद्वारे फोटो पाठवला. दरम्यान, सध्या पाऊस पडत असल्याने शेतीची काम सुरू आहेत. त्यामुळे बुधवारी गंगारामच्या घरातील सर्व माणस आपल्या भात लावणीच्या कामा साठी शेतीवर निघून गेली होती. दरम्यान, यावेळी गंगाराम एकटाच घरी होता त्यावेळेस त्यांनी  स्वतःच्या राहत्या घरी घरचे सगळे शेतावर गेले असताना  गंगारामने घरातच गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली. गंगाराम चौधरी हे चळणी येथील शाळेत  चित्रकला शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांचे लग्न 2016 साली झाले होते. गंगाराम चौधरी हे चळणी येथील शाळेत  चित्रकला शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांचे लग्न 2016 साली झाले होते.त्यांना एकही अपत्य नसल्याचे  सांगितले.काही दिवसांपूर्वी त्यांची पत्नीही माहेरी गेली होती  व बरेच दिवस ती आली नव्हती.
       

गंगाराम हे चांगले वारली चित्रकार ही होते.ते शाळेतील काम संपल्यावर सतत वारली पेंटिंग करून त्या विक्रीही करायचे. मात्र आत्महत्येचं कारण समजू शकले नसले तरीही ही आत्महत्त्या कौटुंबिक कलहातून झाली असल्याची शक्यता पोलीस वर्तवित आहेत . सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद कासा  पोलीस ठाण्यात करण्यात आली असून  कासा पोलीस ठाण्याच्या  सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धवा जायभाये यांच्या नेतृत्वाखाली कासा पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

९० वर्षीय नवऱ्याला रॉकेल टाकून पेटवले अन् स्वत:ही जीव सोडला; कारण ऐकून धक्का बसेल

 

गुंतवणूकीवर दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून तिघांना लाखोंचा गंडा

 

अखेर पाक सरकार झुकलं; कुलभूषण जाधव यांना भारतीय दूतावासातील २ अधिकारी भेटणार

 

...अन् 'बेबी पेंग्विन' हॅशटॅग ट्रेंड झाला!; जाणून घ्या आदित्य ठाकरेचं काय आहे 'कनेक्शन'

 

मदरशामध्ये शिक्षकाने चार वर्षे केला विद्यार्थिनीवर बलात्कार; आता गुन्हा दाखल झाला

 

पनवेलच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये २५ वर्षीय तरुणीचं लैंगिक शौषण, विकृत प्रकार आला समोर

crim

Web Title: The teacher committed suicide by writing the date of death from his own picture line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.