ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू; दोन जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 21:06 IST2021-07-23T21:04:33+5:302021-07-23T21:06:34+5:30
Accident Case : राष्ट्रीय महामार्गावरील कोळंबी बस थांब्यावरील घटना

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू; दोन जखमी
मूर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावरील कोळंबी बस थांब्या नजीक ट्रकच्या धडकेत एक दुचाकीवरील महिला ठार झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या दरम्यान घडली, या अपघातात दोन जण जखमी झाले असून माधुरी महल्ले असे मृतक महिलेचे नाव आहे.
बोरगाव पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दुधलम येथील रविंद्र किसन महल्ले वय ४३, पत्नी माधुरी रविंद्र महल्ले वय ३८, मुलगा दत्ता रविंद्र महल्ले वय १२ हे दुधलम येथुन आपल्या दुचाकी क्रंमाक एम एच ४० जी ७२८६ ने काटेपुर्णा येथे जात होते, दरम्यान कोळंबी बस थांब्यावरील गतीरोधक ओलांडत असताना मूर्तिजापूर वरुन पाठमागुन येणाऱ्या व अकोलाकडे जाणारा ट्रक क्रमांक एम एच ४० बी.एल. ८३८७ या ट्रकच्या खाली सापडून माधुरी रविंद्र महल्ले वय ३८ यांच चिरडून घटनास्थळीच मृत्यू झाला दुचाकीस्वार रविंद्र किसन महल्ले वय ४५ व त्यांचा मुलगा दत्ता रविंद्र महल्ले वय १२ हे दोघे सुदैवाने बचावले असून किरकोळ जखमी झाले, दरम्यान घटनेची माहिती मिळताच काटेपूर्णा येथील वंदेमातरम आपत्कालीन पथक, ठाणेदार सुनील सोळंके, पोलिस कर्मचारी दिपक कानडे, फहीम शेख, नामदेव केंद्रे,,सह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मूर्तिजापूर येथील रुग्णालयात आणला आहे. घटनास्थळाचा पंचनामा करून घटनेतील चालकासह ट्रक ताब्यात घेऊन पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस करत आहेत.