शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

दोन ट्रकची टक्कर : १०० बकऱ्या ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 11:38 PM

बकऱ्या घेऊन येत असलेल्या ट्रकने कोळसा घेऊन जात असलेल्या ट्रकला जोरात धडक दिली. त्यात ट्रकमधील अंदाजे १०० बकऱ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, ट्रकचालक गंभीर जखमी झाला.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील डुमरी शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (कन्हान) : बकऱ्या घेऊन येत असलेल्या ट्रकने कोळसा घेऊन जात असलेल्या ट्रकला जोरात धडक दिली. त्यात ट्रकमधील अंदाजे १०० बकऱ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, ट्रकचालक गंभीर जखमी झाला. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) पोलीस नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील डुमरी शिवारात गुरुवारी (दि. २३) रात्री ७ वाजताच्या सुमारास घडली.डुमरी (ता. पारशिवनी) शिवारात वेकोलिची कोळसा सायडिंग आहे. त्या सायडिंगमधून एमएच-४०/एन-४८७७ क्रमांकाचा ट्रक कोळसा घेत महामार्गाच्या दिशेने येत होता. त्याचवेळी एमएच-२०/एटी-२९१२ क्रमांकाचा ट्रक मध्य प्रदेशातून बकऱ्या घेऊन नागपूरच्या दिशेने जात होता.या दोन्ही ट्रकची टी-पॉईंटजवळ आपसात जोरदार धडक झाली. त्यात बकऱ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला असून, ट्रकमधील अंदाजे १०० बकऱ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जखमी ट्रकचालकाचे नाव कळू शकले नाही. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृत बकऱ्या व दोन्ही ट्रक ताब्यात घेतले. शिवाय, जखमी ट्रकचालकास उपचारासाठी कन्हान येथील रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी कन्हान पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू