शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

नगर अर्बन बॅंक फसवूणक प्रकरणी आणखी दोघे जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 22:01 IST

Crime News : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केली अटक

ठळक मुद्देआशुतोष सतीश लांडगे (वय ३८, रा. अहमदनगर), जयदीप प्रकाश वानखेडे (वय ३४, रा. पुणे, मूळ रा. श्रीरामपूर ), असे सोमवारी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पिंपरी : नगर अर्बन को-ऑप बॅंकेच्या २२ कोटींच्या फसवणूक प्रकरणी आणखी दोघांना सोमवारी (दि. ८) अटक करण्यात आली. या गुन्ह्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आत्तापर्यंत एकूण चार आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यातील इतर आरोपींच्याही मागावर पोलीस आहेत.    आशुतोष सतीश लांडगे (वय ३८, रा. अहमदनगर), जयदीप प्रकाश वानखेडे (वय ३४, रा. पुणे, मूळ रा. श्रीरामपूर ), असे सोमवारी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यापूर्वी नवनीत शांतीलाल सूरपुरिया (वय ५५, रा. अहमदनगर) आणि यज्ञेश बबन चव्हाण (वय २५, रा. संभाजीनगर, चिंचवड) या दोघांना अटक केली होती. याप्रकरणी महादेव पंढरीनाथ साळवे (वय ५६, रा. अहमदनगर) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात २५ जानेवारी २०२१ रोजी फिर्याद दिली आहे. बॅंकेच्या चिंचवड येथील शाखेत २६ मार्च २०१८ ते २५ जानेवारी २०२१ दरम्यान हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानुसार बबन निवृत्ती चव्हाण, वंदना बबन चव्हाण, यज्ञेश बबन चव्हाण, मंजुदेवी हरिमोहन प्रसाद (सर्व रा. चिंचवड), रामचंद्र अण्णासाहेब तांबिले (रा. वाल्हेकरवाडी), अभिजित नाथा घुले (रा. अहमदनगर), यांच्यासह कर्ज उपसमिती सदस्य, तसेच नगर अर्बन को-ऑप बॅंकेचे संचालक सदस्य यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे.  

आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मे. नेश लिब टेक्नोरिअल व मे. इंडियन इंजिनियरिंग इंडस्ट्रिज पुणे या फर्मचे कर्जदार आरोपी यांनी आपसात संगनमत करून स्वत:च्या फायद्यासाठी कर्जप्रकरण केले. त्यासाठी तारण गहाण मिळकतीचा बनावट मूल्यांकन अहवाल दिला. कर्ज उपसमिती सदस्य व बॅंकेच्या संचालक सदस्यांनी तो अहवाल स्वीकारून बॅंकेची २२ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केली. 

फसवणूक प्रकरणात दाखल गुन्ह्याचा तपास करीत असताना आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात येत आहे. या गुन्ह्यातील अन्य आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. त्यासाठी पोलिसांचे पथक नियुक्त केले आहे, असे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी सांगितले.

टॅग्स :ArrestअटकPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडEconomic Offence Wingआर्थिक गुन्हे शाखा